🤝 एक नात: भाषा,प्रांत आणि रक्तापलीकडे: रेल्वे प्रवासा दरम्यान हैद्राबाद येथील गरोदर रजनीदेवीसाठी कुर्डूवाडीतील प्रतीक्षाताई बनल्या देवदूत. वाचा अगदी सविस्तर.
कुर्डूवाडी: (प्रतिनिधी नसीर बागवान) देवदुता प्रमाणे महीलेच्या मदतीला धावुन आल्या प्रतिक्षाताई गोफणे. प्रतिभाताई जपले नाते भाषा आणि प्रांतापलीकडे…होय… झाले असे की हैद्राबाद मधील सुनिल कुमार महतो व त्यांची पत्नी रजनीदेवी नोकरी निमित्त राजकोट एक्सप्रेसने गुजरातकडे निघाले होते. रजनीदेवी या गरोदर होत्या त्यांच्या बरोबर त्यांचा पती व एक लहान मुलगी होती राञी १०:३० वाजता गाडी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर येत असताना त्या रजनीदेवीच्या पोटात अचानक प्रस्तुतिच्या वेदना होऊ लागल्या.सदर महिलेच्या पतीने रेल्वे पोलीसांच्या मार्फत कुर्डुवाडी स्टेशन मास्तर यांना सदर घटनेविषयी माहीती दिली.गाडी रेल्वे स्थानकावर पोहचताच ते कुटुंब गाडीतुन खाली ऊतरले त्यावेळी रजनीदेवीनां खुप ञास होऊ लागला होता त्यावेळी रेल्वे स्टेशन वर उपस्थित असलेले मिलन गोफणे यांनी आपल्या वहीनी कुर्डुवाडी शहर भाजपा महीला शहरअध्यक्षा प्रतिक्षा ताई गोफणे यांना फोन वरुन संपर्क साधला या वेळी प्रतिक्षाताईनी लगेचच स्थानिकाच्या मदतीने व रेल्वे दवाखाना डाॅक्टर व कर्मचारी तसेच रेल्वे पोलीस यांच्या मदतीने सदर महिलेला कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. सदर महीलेची प्रस्तुती तेथील डाॅक्टर व कर्मचारी यांनी केली.बाळ व तिची आई दोघेही सुखरुप आहेत.या घटनेसाठी तत्परतेने मदत केल्याबद्दल प्रतिक्षाताई यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे असे त्यावेळी रजनीदेवीचे पती यांनी मत व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले.भाषा,प्रांत ओलांडून रक्ताचं नातं नसताना एकमेकांच्या मदतीला जाणे याचे उत्तम उदाहरण हे असू शकते.सदर घटनेत रेल्वे डाॅक्टर करीमुन व कर्मचारी,स्टेशन मास्तर सुखदेव कुंभार,रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार माने MT, जिराग PN,विकास भोसले, व ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टर व कर्मचारी तसेच सौरभ परबत,ईरशाद कुरेशी,आदित्य मोरे,अक्षय बागल , बालाजी कोळेकर किसन गोडसे अतुल बागल अनिकेत मोरे यांचे सहकार्य लाभले.