🚩 मराठ्यांच्या अभिमानाचा लढा दाखविणारा ‘बलोच’ उद्या होणार प्रदर्शित…🐎🐎🐎

इंदापूर, प्रतिनिधी :- मराठ्यांची विजयगाथा ‘बलोच’ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट आपल्यासमोर यायला सज्ज झाला आहे. उद्या ५ मे ला हा चित्रपट इंदापूर तालुक्यासह सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे..
सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या ‘बलोच’ चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या ‘बलोच’ हा चित्रपट उद्या सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे..
या आधी प्रदर्शित केलेल्या टीझरमध्ये चित्रपटाची भव्यता दिसत असून अंगावर शहारे आणणारा तो टीझर झाला होता. कोट्यावधी लोकांना तो टिझर आवडला आहे,या चित्रपटात प्रवीण तरडे यांचे मनाला भिडणारे संवाद, मराठ्यांचे साम्राज्य टिकवण्यासाठीची तगमग दिसतेय. पानिपतच्या लढाईत पराभव झाल्यानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळणाऱ्या मराठ्यांची व्यथा सांगणारा आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट उद्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या चित्रपटाचे प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शक आहेत. यात प्रवीण विठ्ठल तरडे आणि अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दत्ता काळे (डी के), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.आपण सर्वानी सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट सिनेमा गृहात जाऊन पहावा अशी विनंती निर्माते संतोष बळी भोंगळे यांनी केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here