जनता एक्सप्रेस मराठी न्यूज प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी
दौंड: यवत पोलीस स्टेशन हद्दीत चालणाऱ्या अवैध गावठी दारू तयार करणाऱ्या दारुभट्यावरती यवत पोलिसांनी कारवाई करत सर्व दारुभट्या नष्ट करत मुद्देमाल जप्त करून अवैध दारू व्यावसायिकाना चांगलीच चपराक दिली आहे.या जोरदार कारवाईत पाटस येथील धनगरवाडा,केडगाव हद्दीतील बावीस फाटा येथे नाना वस्ती ,खोर ,नांदूर गावच्या हद्दीत संचेती फार्म जवळ ,तसेच डूबेवाडी हद्दीत पिलाणवाडी अशा विविध ठिकाणी गावठी दारू तयार करून अवैधपणे विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके तयार करून एकाच दिवशी वरील पाच ठिकाणी छापे टाकून सदर कारवाई केली. अवैध गावठी दारू विक्री अड्ड्यांवर कायदेशीर कारवाई करून १५,००० लिटर कच्ची रसायने व इतर एकूण जवळपास दोन ते अडीच लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत तसेच परिसरातून पोलीस निरीक्षक नारायण पवार व त्यांचे सहकारी यांचे परिसरातील नागरिकांकडून विशेषतः महिला वर्गाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.