🚜 अवसरीच्या सरपंचाचा नाद नाय करायचा… बारामती ॲग्रो कारखान्यासाठी इंदापूरहून रेकॉर्ड ब्रेक वाहतूक.

इंदापूर: साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला की रस्सीखेच लागते ती ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची, एका खेपे मध्ये कोण जास्त ऊस घेऊन जातो, कोण काटा लॉक करतो …साधारणपणे ट्रॅक्टर चालक वीस ते पंचवीस टनापर्यंत उसाचे वाहतूक करतात. मात्र गुरुवारी अवसरीच्या सरपंचाचा म्हणजेच संदेश शिंदे यांच्या ट्रॅक्टरने इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव मधून पंजाबराव (बापू) गायकवाड प्रगतशील बागायतदार यांचा बारामती ॲग्रो साठी एका खेपे मध्ये तब्बल ३८.५५१ एवढा टन ऊस वाहतूक करून प्रथमच उच्चांकी विक्रम केला आहे. बारामती ॲग्रो कारखान्यावर ही एवढ्या लांबून इंदापूरहून आलेला ट्रॅक्टरला पाहून तेथील कामगार ही अवाकच झाले. सर्वप्रथम ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करणारा पोपट चव्हाण याला तेथील कामगारांनी आणि विशेष करून पांडे व नायकुडे फिल्डमन साहेबांनी शाब्बासकीची थाप देऊन वारे पट्ट्या असे म्हणून कौतुक केले. सरपंच संदेश शिंदे यांचे देखील त्यांनी कौतुक केले जवळपास भाटनिमगाव ते बारामती ॲग्रो अंतर हे ६५ ते ७० किलोमीटर एवढे आहे. एवढी लांबून वाहतूक करणे आणि एवढ्या टनाची तेवढे सोपे काम नाही परंतु ट्रॅक्टरचा ड्रायव्हर ही खूप अनुभवी होता त्यामुळे ते शक्य झाले. सरपंच संदेश शिंदे यांनी यावर्षी देखील ऊस तोडी साठी अवसरी मधीलच गावटोळी केली आहे. तसेच हे ऊसतोड मजूर अगदी कामाचे व पारकून घेतल्यामुळे त्यांचे चांगल्यापैकी टनेज सुद्धा जुळत आहे. या ऊसतोड करणाऱ्या टोळीचे मुकादम अवसरी मधीलच पांडुरंग जाधव आहेत. यांचे पूर्ण या ऊस टोळी वरती नियंत्रण असते .हे मुकादम अगदी चांगल्या प्रकारे ऊसतोड मजुरांकडून चांगले काम करून घेतात त्यामुळे सरपंच संदेश शिंदे देखील मुकादम पांडुरंग जाधव व सगळ्याच ऊसतोड मजुरांवर कामामुळे खुश आहेत असे चित्र दिसून येत आहे.


➡️ परंतु याचीच दुसरी बाजू पााहायला गेलं तर अशी वाहतुक करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणे असेच आहे त्यामुळे वेळोवेळी सर्व कारखान्यांकडून व प्रशासनाकडून ट्रॅक्टरवाल्यांना अशी धोकादायक वाहतूक करू नये असेच आवाहन  केले जात असते.


 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here