🏏 एकाच ओव्हरमध्ये मारले 7 षटकार, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने केला विश्वविक्रम..!🥎🥎

क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्यांतील थरार पावसामुळे पाहायला मिळाला नसेल, परंतु ऋतुराज गायकवाडने विजय हजारे चषकमधील वनडे सामन्यात केलेल्या खेळीची झलक नक्कीच पाहता येईल. कारण या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराजने उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली आहे.
💪 ऋतुराजने मारले एका ओव्हरमध्ये 7 षटकार…
👉 आज 28 नोव्हेंबरला रोजी विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला जात आहे. आजचा सामना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात होत आहे. या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध नाबाद 220 धावा करताना ऋतुराजने तब्बल 16 षटकारांचा पाऊस पाडला आणि 10 चौकार मारले.
👉 महाराष्ट्राच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सलामीवीर ऋतुराज गायकवाडने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर आणि अंकित बावणे-काझी यांच्या साथीने 5 बाद 330 धावा केल्या आहेत. ऋतुराजने 159 चेंडूत 220 धावांची नाबाद खेळी केली आहे.व्हिडिओ👇 https://twitter.com/BCCIdomestic/status/1597134087470215168?t=SIPC3uqhuBJ2y-aA9tTqmg&s=19 दरम्यान ऋतुराज गायकवाडने 49व्या ओव्हरमध्ये शिवा सिंहला सलग 7 षटकार मारून इतिहास रचला आणि युवराज सिंहच्या इंग्लंडविरुद्धच्या खेळीचीही आठवण करून दिली. ऋतुराज गायकवडने एकाच ओव्हरमध्ये मारलेल्या 7 षटकारांचा व्हिडीओ तुम्ही ‘बीसीसीआय डॉमेस्टिक’ या ट्विटर अकाऊंटवर पाहू शकता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here