इंदापूर तालुका(पश्चिम विभाग)प्रतिनिधी: निलेश भोंग
छत्तीसगड सीमाभागात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले निमगाव केतकी गावचे सुपुत्र सुरेश मिसाळ यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी श्री केतकेश्वर विद्यालय येथे शहीद स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक एस. पी. जराड, हवालदार भोंग, तसेच चव्हाण यांनी दौंड येथून या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. निमगाव केतकी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अतुल मिसाळ यांनी अध्यक्षपद भूषवले. यावेळी बोलताना अतुल मिसाळ यांनी सांगितले की देश सेवा करत असताना आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या शहीद कुटुंबीयांना समाजातून आदराचे स्थान दिले पाहिजे. त्याचप्रमाणे देशसेवा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने पुढे आले पाहिजे. पोलीस उपनिरीक्षक एस.पी.जराड यांनी शहीद सुरेश मिसाळ यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याच बरोबर नक्षलवादी क्षेत्रात कशाप्रकारे काम केले जाते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांच्या वतीने सानिया मोरे हिने शहीद सुरेश मिसाळ यांना आदरांजली वाहून भाषण केले व उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी शहीद सुरेश मिसाळ यांच्या पत्नी लता मिसाळ तसेच त्यांचे कुटुंबीय निमगाव केतकी चे उपसरपंच सचिन चांदणे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत, प्राचार्य पवळ, तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन के.डी.भोंग सर यांनी केले. तर श्री हेंद्रे सर यांनी आभार मानले.