👉 तावशी येथील कार्यक्रमाप्रसंगी आमदार श्री भरणे मामा यांनी तावशी ग्रामस्थांना पूलासंर्दभात दिलेल्या आश्वासनांची केली पूर्ती.
👉 आश्वासनपूर्तीचा शब्द पाळल्याने तावशी परिसरासह निरा नदीलगत गावांतील हजारो ग्रामस्थांनी मानले आमदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांचे आभार..
इंदापूर: गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे – सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या निरा नदीवरील तावशी ते आसु या नविन पुलाची आग्रही मागणी दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामस्थांसह,तमाम शेतकरी बांधव सातत्याने करत होते.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मा.राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय (मामा)भरणे यांनी सदर पूलाच्या कामाची मागणी करून या पूलासाठी तब्बल १७ कोटी रुपये मंजूर करून घेऊन उध्दट – तावशीसह सातारा जिल्ह्यातील आसुलगत असलेल्या अनेक गावांतील ग्रामस्थांसह शेतकरी बांधवांची अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण केली.
आमदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या या दमदार कामगिरीमुळे उध्दट-तावशी परिसरातील ग्रामस्थ,शेतकरी बांधव,व्यापारी,विद्यार्थी यांना सातारा जिल्ह्यात जाणारे जवळ जवळ २५ ते ३० किलोमिटर अंतर वाचणार आहे.या अगोदरही आमदार श्री भरणे मामा यांनी इंदापूर तालुक्यातील खोरोची,बोराटवाडी या निरा नदीवरील गावांच्या पूलांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करून पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडण्याचे काम केले असून तावशी ते आसू या पूलासाठीही नव्याने मंजूर केलेल्या १७ कोटी रूपयांच्या निधीमुळे पुणे – सातारा अंतर कमी झाले असून तावशी येथील विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने नविन पूलासाठी आमदार श्री भरणे मामा यांच्याकडे मागणी झाली होती. सदर मागणीचा आदर करत आमदार श्री भरणे मामा यांनी समस्त तावशी ग्रामस्थांना नविन पूलासाठी निधी मंजूर करणार असल्याचा जाहीर शब्द दिला होता.सदर १७ कोटी रुपये निधी मंजूर करून आमदार श्री भरणे मामा यांनी तावशीसह परिसरातील ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला असल्याने” बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ” अशा प्रकारच्या शाब्दिक आभाराच्या भावना उध्दट – तावशी परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.