👉 जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आकाशाला गवसणी घालणारा निमगावचे तरुण तडफदार युवा नेते म्हणूनॲड सचिन राऊत यांची ओळख..
उपसंपादक निलकंठ भोंंग:
पुणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली आणि इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरू झाली. नेते मंडळींच्या गाठीभेटी, दौरे, कार्यकर्त्यांना चहापाणी आणि आपल्यालाच पक्षाचे तिकीट कसे मिळणार यावरही बतावण्या चालू झाल्या. काहींचे तर कुठेच काही नसताना आणि राजकारणात सक्रिय नसतानाही नावे समोर येऊ लागली.इंदापूर तालुक्यात ९ जिल्हा परिषद आणि १८ पंचायत समिती जागांसाठी आरक्षण जाहीर झाले यात निमगाव केतकी – शेळगांव गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने तिकीट नेमके द्यायचे कोणाला हा पेच सध्या पक्षश्रेष्ठींनी समोर आहे. कारण या गणात अनेक इच्छुक उमेदवार असून तिकीट न मिळाल्यास बंडखोरीची ही शक्यता नाकारता येत नाही.
निमगाव केतकी – शेळगाव गणात ॲड. सचिन नारायण राऊत यांना तिकीट मिळण्यासाठी निमगाव केतकी येथील युवकांनी मागणी केली आहे. परंतु तिकीट कोणत्या पक्षाकडून मिळावे हे त्यांनी सांगितले नाही. कारण ॲड. सचिन राऊत यांचे सर्वच पक्षाशी चांगले संबंध असून सर्वच पक्षातील लोक त्यांना मानतात. तसेच त्यांच्या घरीही त्यांचे येणे जाणे असते. व्यवसायाने वकील असणारे राऊत हे नेहमीच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असतात.फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब च्या माध्यमातून त्यांनी वन्य प्राण्यांसाठी वर्षभर पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे.त्याचप्रमाणे कोरोना काळात अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यातही राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे .कारण कोरोना काळात अत्यावस्थ झालेल्या रुग्णांना बेड मिळवण्यासाठी ॲड. सचिन राऊत यांनी खूप प्रयत्न करून रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्यदूत, कोरोना योद्धा यांसारखे असंख्य पुरस्कार देखील मिळाले आहेत.परिस्थिती प्रगतीवर मात करीत नाही, तर प्रगती परिस्थितीवर मात करू शकते, फक्त हवा स्वतःमध्ये आत्मविश्वास व नजरेसमोर मोठे ध्येय बस्स लढायचं आपण आपल्याशीच स्वतःवर विजय मिळवू शकलो तर जग जिंकण कठीण नाही.!!या विचाराने प्रेरित होऊन सदैव समाजातील तळागाळातील वंचित गरीब गरजू होतकरू माणसांची सेवा करताना ते कार्यमग्न दिसून येतात सर्वच क्षेत्रात सामाजिक राजकीय धार्मिक निसर्गात काम करीत असताना ते कधीही थकलेले पाहायला मिळत नाहीत. कोणत्याही क्षेत्रात त्यांचा आदरयुक्त दबदबा कायम आहे.प्रशासनावर मजबूत पकड असणारे राऊत यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. निमगाव केतकी येथील पूर परिस्थितीच्या काळात देखील त्यांनी नुकसानग्रस्तांचे पंचनामे करणे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठीही अनेक प्रयत्न केले आहेत. निमगाव केतकी येथील शासकीय रुग्णालयातील ॲम्बुलन्स पळवण्याचा काही लोकांनी घाट घातला होता परंतु वेळीच ॲड. राऊत यांनी आवाज उठवून ती ॲम्बुलन्स निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयात परत आणली. वकील क्षेत्रात काम करत असताना त्यांच्याकडून नागरिकांना नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत असते.निमगाव केतकी तील शेतकरी रक्ताचे पाणी करून शेती पिकू लागला पाणमळ्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा टोमॅटो उत्पादनावर वळवला होता. यावेळी बाहेर राज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केली होती.यावेळेस सायकलवर गावात येऊन या बलाढ्य शक्तीच्या व्यापाऱ्यांना आव्हान देत जवळपास 200 शेतकरी एकत्र करून दलाली व बोली पद्धत बंद केली. व थेट शेतकऱ्यांच्या शेतात शेतमाल म्हणजे टोमॅटो विक्रीसाठी मोठे आंदोलन उभारणारे पंचक्रोशीतील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे राऊत वकिल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.त्यावेळेस त्यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून सर्वजण ओळखू लागले.येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक तिकिटेबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षापासून सामाजिक, राजकीय, शेती, शैक्षणिक, तसेच आरोग्य क्षेत्रात काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही.सर्व सामान्याचे प्रश्न सोडवण्यात जो आनंद आहे त्यात मी समाधानी असून निमगाव केतकी तेथील युवकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो परंतु निवडणूक लढवणार की नाही याबाबत त्यांनी मौन धारण केले.निमगाव केतकी येथील बहुतांश युवकांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी ॲड. राऊत यांना सर्वतोपरी मदत करणार असून वेळप्रसंगी वर्गणी करून ही निवडणूक लढवून ॲड.सचीन राऊत यांना निवडून आणणारच असा विश्वास व्यक्त केला .