३९ वर्षे इमानेइतबारे नोकरी करणारे संपत (आप्पा) रामचंद्र देवकर यांचा योगायोग- सेवानिवृत्ती आणि बर्थडे पार्टी एकाच दिवशी.

पाटस, ता. दौंड येथील संपत (आप्पा) रामचंद्र देवकर हे दिनांक — ३०/०९/२०२२ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या , सेवापूर्ती, बर्थडे व ६१ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आज दिनांक — ०१/१०/२०२२ रोजी पाटस येथील पंचरत्न मंगल कार्यालयात मोठ्या थाटात पार पडला. ते पाटस येथील खडकवासला कालवा पाटबंधारे विभागामध्ये (कडावर) नोकरीस होते, त्यांची एकुण ३९ वर्षे सेवा झालेली असून त्यांनी केलेल्या इमानेइतबारे सेवेचा अधिकारी व कर्मचारी वर्गाने तसेच पाटस येथील स्थानिक नेतेमंडळींनी आपल्या भाषणात त्यांचे बद्दल गौरवोद्गार काढले.

या कार्यक्रमासाठी खडकवासला पाटबंधारे उपविभाग क्रमांक २ पाटस चे उपविभागीय अधिकारी. टकले साहेब, तसेच त्यांचे विभागातील सर्व शाखा अभियंता आणि त्यांचे कार्यालयातील सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे पाटस येथील दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती साहेबराव वाबळे, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सागर वसंतराव शितोळे पाटील, प्रतिष्ठीत नागरिक डॉ. मधुकरजी आव्हाड, शिवाजीराव ढमाले, नागेश्वर विद्यालय पाटस रयत शिक्षण संस्थेचे संचालक नामदेवनाना शितोळे, भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक. हौशीरामदादा शितोळे, प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ते अरविंदजी गायकवाड, प्रमोद ढमाले, अशोकराव पानसरे, रमेशजी जाधव, तोंडे पाटील, शहाजी बापू चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चव्हाण, सत्कारमूर्ती ‌संपत आप्पा देवकर यांचे सर्व नातेवाईक तसेच पाटस गांवचे सेवानिवृत्त महसूल अधिकारी, दौंड तालुक्याचे नविन नेतृत्व आणि आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार राजेंद्र निवृत्ती म्हस्के उर्फ म्हस्के भाऊसाहेब इत्यादि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवापुर्ती कार्यक्रम पार पडलेनंतर जेवणाचा आस्वाद ठेवणेत आला होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here