वैभव पाटील :प्रतिनिधी: ( 📞9850868663 )
बुधवार दि.7 सप्टेंबर 2022 रोजी दातिवरे हायस्कूल 1992 मधील एस. एस. सी. बॅच च्या माजी विद्यार्थांनी शालेय विद्यार्थांना खेळाचे साहित्य कवायती साठी रिंग उपलब्ध करून दिल्या.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी दातिवरे हायस्कूल चे मुख्याध्यापक ए.सी.राठोड हे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्च 1992 च्या बॅचचे व त्यांनी शाळेला खेळाचे साहित्य उपलब्ध करुन दिल्या बद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले. मार्च 1992 च्या बॅचचे प्रतिनिधी म्हणून दातिवरे गावचे ग्रामपंचायत सदस्य व दातिवरे गावचे उद्योजक किरण शंकर मेहेर व विजय सुरेश पाटील बांधकाम व्यवसायीक तसेच त्यांच्या बॅचची सर्व मुले मुली आज समाजात चांगले समाजकार्य करीत आहेत.चांगल्या हुद्द्यावर आपला रोजगार करीत आहेत. मुख्याध्यापक राठोड सर हे दातिवरे शाळेत रुजु झाले त्याच वर्षी ही 1992 ची बॅच दहावीच्या बोर्ड परिक्षेला प्रविष्ट झाली. गेली ३० वर्ष शाळेशी असणारे ऋणानुबंध या बॅच ने कायम जपले व त्याच प्रेरणेतुन त्यांनी शाळेला ही भेट दिली.तसेच भविष्यात पण असेच सहकार्य शाळेला करणार असल्याचे वचन त्यांनी आपल्या वर्गमित्रांच्या वतीने मुख्याध्यापकांना दिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक सुशिल ठाकुरसर यांनी केले तर आभार प्रदर्शन रूपेश राऊतसर यांनी केले.आपल्या आभाराच्या वेळी त्यांनी दानपारमितेचे महत्व सांगताना समाजात अनेक प्रकारचे दानधर्म केले जातात पण शाळेला केलेले दान हे सर्वात पवित्र दान आहे व त्याचे प्रतिफळ चिरकाल ठिकणारे आहे.असे सांगुन राठोड सरांचा दांडगा विद्यार्थी संपर्क व त्यामुळे वेळेवेळी माजी विद्यार्थांच्या वतीने शाळेला झालेले सहकार्य पहाता गुरू शिष्य परंपरेचे हे अनोखे दर्शन दातिवरे शाळेत बघायला मिळाले. मार्च 1992 च्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थ्यांच्या प्रती आभार व्यक्त करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले.
Home ताज्या-घडामोडी ३० वर्ष शाळेशी असणारे ऋणानुबंध जपत दातिवरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थांनी शाळेला...