बारामती: २५ वर्षापूर्वी आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत पुन्हा त्याच दहावीच्या बेंचवर बसायचा आनंदच वेगळा… त्याच बेंचवर बसून त्याच विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेत असण्याचा आनंद तर अनुभवला.. पण यावेळी होत्या गहिऱ्या आठवणी, ज्या मनात दाटून आलेल्या.. सर्व चाळीशीतले प्रौढ आज शाळेत जमले.. अगदी शाळकरी मुलांसारखे नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात जमले.शिस्तीत रांगा करून राष्ट्रगीत व प्रार्थना म्हणत यावेळी 20 सेवानिवृत्त शिक्षक आणि 110 माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी जमले.. एवढेच नव्हे तर इयत्ता दहावीच्या वर्गात आपापले बाक पकडून बसले. वर्गशिक्षकांनीही हजेरी घेऊन त्यांना हसत खेळत शिकण्याचा अनुभव दिला. कारण सर्वजण २५ वर्षांनी लहान झाले होते… निमित्त होते माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे! बालपणीच्या शाळेतील आठवणी ताज्या करण्यासाठी पणदरे (ता. बारामती) येथील नव महाराष्ट्र विद्यालयात स १९९८-९९ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.२५ वर्षांपूर्वीच्या आठवणींमध्ये सगळे रमून गेले. या आठवणींच्या हिदोंळ्यावर झुलताना प्रत्येकाचे मन दाटून आले होते.वर्गातील प्रत्येकाला कठीण प्रसंगी मदत करण्याचा संकल्प यावेळी घेत सर्वांनी ‘लहानपण दे गा देवा’ म्हणत साऱ्यांनीच धमाल केली.माजी विद्यार्थ्यांनी शाळेला कायमस्वरूपी उपयुक्त ठरेल असा हायमास्ट दिव्याचा खांब मैदानात उभारून दिला आहे. त्याचे लोकार्पण आणि विद्यार्थी-शिक्षकांच्या आठवणी जागविणाऱ्या ‘ऋणानुबंध’ स्मरणिकेचे प्रकाशन सरस्वती शिक्षण मंडळ व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी न्यायाधीश काकासाहेब जगताप, राजेंद्र कोकरे, माजी प्राचार्य आर. टी. कदम, प्राचार्य पी. के. शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व माजी शिक्षक उपस्थित होते. विविध क्षेत्रात काम करणारे १०० हून अधिक माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.हा नयनरम्या सोहळा पाहून संस्थेचे अध्यक्ष मा. केशवराव (बापू) जगताप भारावून गेले.वर्ग प्रतिनिधी अनिल गुळूमकर, संग्राम शिवाजी जगताप, चेतन प्रताप जगताप, गणेश खामगळ, रमेश शेजाळ, केदार कांबळे, आरती कोकरे, मोनिका शहा, राजेंद्र जगताप, नंदकुमार भापकर, विश्वजित संभाजी जगताप, अंकुश कराळे, गणेश कोकरे, महादेव भिसे, गणेश जगताप, जयश्री जाधव, नीता लोखंडे, कोमल जगताप, वर्षा कोकरे यांनी संयोजन केले. वर्गशिक्षक एच.एल. पवार, बी. ए. ढोबळे, व्ही. एस. महादार, व एल. ए. आतार यांनी घेतलेला तास आणि सर्वांच्या दिलखुलास गप्पा सर्वांना शालेय जीवनाची अनुभूती देऊन गेल्या. माणूस कितीही मोठ्या पदावर पोचला तरी बालपण, सवंगडी, शालेय जीवनातील मित्र – मैत्रिणींच्या सहवासात घालवलेले दिवस आणि गमतीजमती कधीच विसरू शकत नाही. लहानपणीचा तो काळ सुखाचा आयुष्यात पुन्हा कधी अनुभवता येईल असे कुणाला वाटले नव्हते. मात्र स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने काही वेळ सर्वांना १५ वर्षांचे झाल्याचा भास झाला, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली….
Home Uncategorized २५ वर्षापूर्वी ज्या बेंचवर शिकले त्याच बेंचवर पुन्हा नव महाराष्ट्र विद्यालयात सन...