सातारा : आपल्या न्याय हक्कासाठी आणि आपले राजकीय शैक्षणिक आरक्षण वाचविण्यासाठी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार व OBC नेते कल्याणराव दळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे येत्या २५ तारखेला होणाऱ्या OBC VJNT बहुजन परीषदेला सातारा जिल्ह्यातील सर्व OBC व VJNT समाज बांधवांनी मोठ्या संख्येने राहावे असे आवाहन OBC समाजाचे सातारा जिल्हा समन्वयक आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी केले आहे .यावेळी विजय सपकाळ म्हणाले राज्यातील ओबीसी व्हीजेएनटी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि राजकीय आरक्षणा पासून ते जात निहाय जणगणनेसाठी राज्यासह देशात उठाव करणारे या राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार व ओबीसी नेते कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी राज्य समन्वयक अरुण खरमाटे , संजय बापू विभुते यांच्यासह राज्यातील हजारो ओबीसी व्ही जे एन टी व एस बी सी नेते त्यांच्या शेकडो संघटना एकत्र येवून ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परीषदेची स्थापना ओबीसीचे नेते कल्याणराव दळे यांच्या प्रमुख उपस्थित आणि मंत्री विजय वडेट्टीटीवार यांच्या हस्ते उद्दघाटन होणार आहे .
हा तर इतर मागास ओबीसीच्या आणि व्हीजेएनटी या अतिशय मागास समाज्याचा सुवर्ण दिन आहे. छत्रपती शाहू महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर OBC समाज बांधवांच्या जीवनात या बहुजन परीषदेमुळे एक नविन पर्व ओबीसी सर्व अस संघटन मंत्री विजय वडेट्टीवार आणि कल्याणराव दळे यांच्या मुळे होणार आहे .
आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटणार असून सर्वसामन्य समाज बांधवांना न्याय देणार हक्काच व्यासपीठ संघटन उभ राहात आहे . या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार होण्यासठी आपले आरक्षण वाचवण्यासाठी अभी नही तो कभी नही त्यामुळे मोठ्या संख्येन उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी जिल्हा समन्वयक विजय सपकाळ यांनी केले आहे .
तसेच राज्याचे ओबीसी नेते कल्याणराव दळे साहेबानी व त्यांचे सहकारी ओबीसी राज्य समन्वयक अरुण खरमाटे संजय विभूते प्रतापराव गुरव दत्तात्रय चेचर पांडूरंग भोवर आदीनी सातारा जिल्ह्यामध्ये रविवारी व सोमवारी झंझावती दौरा केला. यामध्ये त्यांनी कराड उंब्रज सातारा लोणंद मध्ये ओबीसी समाजाच्या काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी ओबीसी समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला . यामध्ये त्यांनी ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी समाजाच्या अडचणी प्रश्न समजून घेतल्या त्याच बरोबर मुंबई येथे येत्या २५ तारखेला होणाऱ्या ओबीसी व्हीजेएनटी परीषदेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवानही करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत ओबीसी समाज्याचे सातारा जिल्हा समन्वयक विजय सपकाळ, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे,बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष शंकरराव मर्दाने जेष्ठ नेते भाऊ दळवी बापूराव काशिद, चंद्रकांत जगताप बारा बलुतेदार महासंघाचे पाश्चिम महाराष्ट्राचे विभागीय संघटक संजय परदेशी, ओबीसी संघटनेचे जिल्हा महासचिव प्रमोद क्षिरसागर, ओबीसी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुनिता लोहार , आंतराष्ट्रीय मानवधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष साळुंखे, मुस्लीम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रसिदभाई बागवान अजीत काशिद कर्मचारी संघटेनेचे राज्य उपाध्यक्ष भानुदास वास्के, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, रणजित साळुंखे, गुरव समाज्याचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गुरव नानासाहेब इंदलकर, युवराज मोहरकर, हरिदास जाधव, अमर म्हेत्रे, नानासाहेब गुरव, चंद्रकांत क्षिरसागर, श्रीकांत पवार, बाबुराव रणदिवे, योगेश साळुंखे, राजू नाईक, अरुण खरे, निलेश साळुंखे, प्रकाश खटावकर, रविंद्र कांबळे, दिपाली लोहार, शांता जानकर, शोभा तावरे किसन गुरव, दिलीप साळुंखे श्री कुंभार आदी उपस्थित होते .
Home Uncategorized २५ तारखेला होणाऱ्या ओबीसी व व्हीजेएनटी परीषदेला प्रचंड संख्येने उपस्थित रहा-महाराष्ट्र नाभिक...