उपसंपादक निलकंठ भोंग
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर यांचे द्वारे शिक्षकांच्या कल्याणासाठी दिला जाणारा शिक्षक कल्याण निधी यामध्ये वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळ रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घेणार.दि.१८. सप्टेंबर रोजी ही सर्वसाधारण सभा होत असून इंदापूर तालुक्यातील डीसीपीएस सभासद धारकांना ३० लाख रुपयाचा मदतनिधी दिला जाईल असे सकारात्मक आश्वासन सभापती यांनी यावेळी दिले. जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन आज संचालक बोर्डाला सादर केले यामध्ये डीसीपीएस धारकांचे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांनी मत व्यक्त करत असताना या तरुण शिक्षक बांधवांना शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची मदत मिळत नाही म्हणून यांना वाढीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली. आणि हा मुद्दा अगदी ताकतीने लावून धरला. उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मार्गी लावण्याबाबत आश्वासन संचालक मंडळांनी यावेळी दिले. सदर निवेदन देताना डी सी पी एस /एन पी एस बांधवांना येणाऱ्या अडचणी याबाबत सचिन वारे, सचिन दराडे ,शेखर मिसाळ, नितीन राठोड ,दिनेश काळे महेश थंबद यांनी कल्याण निधीच्या वाढीव मदतीबाबत आपले मत व्यक्त केले. प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांनी याबाबत सर्व संचालक मंडळाचे आभार मानले .याप्रसंगी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब नरुटे कास्टट्राईब संघटनेचे अध्यक्ष सुहास मोरे, शिक्षक भारतीय संघटनेचे अध्यक्ष सतीश शिंदे, इब्टा संघटनेचे अध्यक्ष सहदेव शिंदे ,चेअरमन आदिनाथ धायगुडे ,उपसभापती रामचंद्र शिंदे ,सचिव प्रशांत भिसे तसेच ज्येष्ठ संचालक दत्तात्रय ठोंबरे बालाजी कलवले ,सतीश गावडे, अनिल शिंदे, सतीश दराडे ,भारत बांडे,किशोर वाघ, संजय मस्के, भाऊसो वनवे शशिकांत शेंडे, प्रशांत घुले, सचिन देवडे, संतोष तरंगे, सदाशिव रणदिवे,मधुकर भोंग संतोष घोडके,यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.