वडापूरी: जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांच्या वतीने नवरात्र उत्सव २०२२ च्या निमित्त निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे सुश्राव्य असे किर्तन वडापुरी मध्ये ५ ते ७ या वेळेमध्ये होणार असून या कीर्तनासाठी वडापुरी व वडापुरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी किर्तन श्रवण करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज तर्फे केले आहे. अतिशय सुंदर असे या कीर्तनाचे नियोजन जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांनी केले आहे.या कीर्तनासाठी सुप्रसिद्ध मृदंगवादक चंद्रकांत महाराज पांचाळे असणार असून आवाजाचे जादूगार गायनाचार्य उद्धव शिंदे महाराज असणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचे सौजन्य सतुभाऊ सुभाष थोरात हे आहेत. तरी भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा.