ह्रदयद्रावक घटना: काटी येथे झालेल्या अपघातात शाळकरी मुलीला हायवा डंपरने चिरडले.

आज दिनांक 29 जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील काटी येथे खडी वाहतूक करत असलेल्या हायवा डंपरणे मुलीला शाळेत सोडवण्यासाठी जात असलेल्या वडिलांच्या मोटारसायकला धडक दिल्याने यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या हृदयद्रावक घटनेने गावातील ग्रामस्थांनी हायवा डंपर पेटवून दिला.
मिळालेली माहिती अशी की, काटी येथील नानासाहेब कदम हे सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान बुलेट मोटरसायकल क्र.(MH-42 – AV – 3764) वरती मुलांना शाळेत सोडवण्यासाठी जात असताना रस्ते बांधकामासाठी खडीने भरलेला हायवा डंपर क्र.(MH- 42 – T-1653) ने पाठीमागून बुलेट मोटरसायकल ला धडक दिली यामध्ये तृप्ती नानासाहेब कदम (वय 12 वर्ष) ही मुलगी मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असून  नानासाहेब कदम व मुलगा  कृष्णा नानासाहेब कदम (वय 11 वर्ष) हे किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी हायवा डंपर पेटवून दिला.या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या मदतीने या हायवा डंपरची आग विझवण्यात आली असून इंदापूर पोलिसांनी हायवा डंपरचा चालक विनोद महादेव जवरे ( वय 40 वर्ष, रा. खैरा, जि- यवतमाळ) यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here