होय,आमचं ठरलंय…बाळासाहेब घोलप यांनी केला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा सक्रिय होण्याचा निश्चय!उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झाला निर्णय.

इंदापूर: २०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध करत तत्कालीन भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा उघड-उघड प्रचार करणारे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रीय होत असून त्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची साथ सोडत पवारसाहेब,अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे व दत्तात्रयमामा भरणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले.
आज त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन आपल्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे.त्यामुळे श्री.घोलप यांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटलांना जबर धक्का मानला जात आहे. याविषयी बोलताना बाळासाहेब घोलप यांनी सांगितले की,थोड्याशा गैरसमजातून आम्ही २०१९ च्या विधानसभेला भरणे मामांच्या विरोधात प्रचार केला होता.परंतु इथुन पुढे मात्र आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय सुप्रियाताई सुळे व आदरणीय भरणेमामांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेटाने काम करणार असून,ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापुर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला जात आहे.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत आहे.त्यामुळे आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही,म्हणून आम्ही सुद्धा आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच एक नंबरला राहणार आहे हे मात्र नक्की असेही शेवटी त्यांनी सांगितले.
या निमित्ताने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अजून एक मास्टर स्ट्रोक मारला आहे.
तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी यावर बोलताना सांगितले की,लवकरच बाळासाहेब घोलप हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सक्रिय होत असून त्याचा निश्चितपणे फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.तसेच राष्ट्रवादी मध्ये अनेक नेते व पदाधिकारी प्रवेश करणार असून याबाबत लवकरच नावे जाहीर करणार आहेत,असेही ते म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here