हृदयद्रावक घटना: डंपरने तब्बल 17 मेंढ्या चिरडल्या. मेंढपाळ महिलेच्या मन हेलावून टाकणाऱ्या आक्रोशाने हळहळ.

बारामती शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर येत असून बारामती शहरातून इंदापूरला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गावर भरधाव जाणाऱ्या डंपरने तब्बल 17 मेंढ्या चिरडल्याची घटना आज बारामती मध्ये घडली आहे. हा अपघात का भयानक होता की भरधाव डंपर धडकून मेंढ्यांचा अक्षरशा चेन्दामेंधा झाला होता.डंपर क्रमांक- एम एच ११ सी एच ७५११ हा माळावरच्या देवीलगतच्या मार्गावरून इंदापूरकडे जोडणाऱ्या रस्त्याच्या दिशेने निघाला होता त्यावेळी ही घटना घडली असून संभाजी मोठे या मेंढपाळाच्या ह्या मेंढ्या आहेत असे समजते. अपघाताची घटना घडल्यानंतर मेंढपाळ महिलेचा आक्रोश मन हेलवून टाकणारा होता या घटनेनंतर भाजपाचे नेते अभिराज देवकाते हे घटनास्थळी पोहोचून मेंढपाळांना जोवर मदत किंवा भरपाई मिळत नाही तोवर डंपर जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली.काही वेळाने पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू ठेवत मार्ग रिकामा करण्यात आला परंतु बघ्यांची गर्दी जादा असल्याने येथील वाहतुकीस खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here