प्रतिनिधी – महेश सूर्यवंशी
गेल्या दोन वर्षापासून जागतिक महामारी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देऊळगाव राजे येथील ग्रामदैवत शादल बाबा दर्गा उरूस होऊ शकला नव्हता. यावर्षी कोरणा चा प्रादुर्भाव ओसरला आहे राज्य शासनाकडून निर्बंध हटवण्यात आले असून यात्रा-जत्रा यांना परवानगी देण्यात आलेली आहे, त्यानुसार यंदा या वर्षाचे नियोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे . बुधवारी (दिनांक .६)सायंकाळी साडेसात वाजता संदल आणि गुरुवारी (दिनांक .७) कार्यक्रम घेण्यात येणार आहे. रमजानचा पवित्र महिना चालू असल्याने नैवद्य चा कार्यक्रम संदल कार्यक्रम झाल्यानंतर रात्री दहा च्या पुढे पहाटे पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे अशा सूचना भाविकांना आणि ग्रामस्थांना शादवल बाबा दर्गा उरूस समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.