हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला होता.दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, गेली काही वर्षे कोरोनाच्या सावटाखाली बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट मंदावल्याने मोठ्या उत्साहात बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.याच निमित्त इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय इंदापूर येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील लोणी येथे सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व खाऊप वाटप,सणसर – लासुर्णे जि.प. गटातील सणसर येथील इरेगेशन बंगला येथे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन व अंगणवाडी येथे मुलांना खाऊ वाटप तसेच वृक्षारोपण,भिगवण- शेटफळ गळे जि.प. गटातील भिगवण येथे सरकारी रुग्णालय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप सकाळी ११ वाजता तसेच संध्याकाळी ६ वाजता ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी,प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर येथील रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, तसेच आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांना फळे व खाऊ वाटप,बावडा लाखेवाडी जि.प गटातील भोडणी येथे सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप,कळस वालचंदनगर जि.प गटातील जंक्शन येथे सरकारी रुग्णालयांना फळे वाटप तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप,निमसाखर जि.प. गटातील निमसाखर शाखेचे नूतनीकरण,निमगाव येथे दु. १ वाजता सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप. तसेच प्राथमिक शाळेतील विद्याथ्र्यांना फळे व खाऊ वाटप, वडापुरी जिल्हा परिषद गटातील रेडा येथे प्राथमिक शाळेतील विद्याथ्यांना फळे व खाऊ इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आखण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी तालुकाप्रमुख नितीन शिंदे, ज्येष्ठ नेते तथा जिल्हा समन्वयक भिमराव भोसले, ज्येष्ठ नेते तथा जिल्हा समन्वयक विशालदादा बोंद्रे,संजय काळे,अरुण पवार,सुदर्शन रणवरे, दीपक खरात,शहर प्रमुख महादेव सोमवंशी,विजय शिरसट आप्पासाहेब डोंगरे, मंदार डोंबाळे, संदिप चौधरी, सोमनाथ शेंडे,फिरोज पठाण, घोंडीराम सोनटक्के विजय गायकवाड, दत्तु खुडे, पांडुरंग वाघ, अंकुश गलांडे,डॉ.बाळासाहेब भोसले, रणजित बारवकर, अभिजित पाटील, रावसाहेब शिंदे,अमित बामणे, नंदकुमार राजेभोसले, सचिन गांधी, सचिन करकरे, हेमंत भोसले, दत्ता राखुडे, विजय तरंगे, तात्या यादव, दत्ता कदम, कल्याण सवाणे, तुषार दळवी, महादेव कचरे, महेश जगताप, शहर समव्यक संजय खंडागळे शहर संघटक दुर्वास शेवाळे,बंडू शेवाळे, संतोष क्षिरसागर, प्रवीण देवकर,सचिन इंगळे,अविनाश खंडागळे,रामचंद्र पाचांगणे,योगेश वाघमोडे, बंडू खरात इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Home Uncategorized हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंती निमित्त इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात भरगच्च...