अकलूज हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या व्यापक संधी उपलब्ध – डॉ सीता पवार येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, इंदापूरच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ सीता पवार यांनी हिंदी भाषेचा सर्वांगिण अभ्यास केला तर लेखक , कवी , अनुवादक , सिनेमा क्षेत्र, पत्रकारिता क्षेत्र, अशा विविध क्षेत्रातील संधींची माहिती दिली भाषा विचारांचे संप्रेषण करते , त्यामुळे कोणतीही भाषा चांगली किंवा वाईट नसते असे सांगून हिंदी भाषेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांची उदाहरणे त्यांनी सांगितली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ दत्तात्रय बागडे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आलेल्या संधीचे सोने करून जीवनात यशस्वी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यासाठी वाचन, चिंतन, मनन, करून आपली वेगवेगळी कौशल्ये विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.शै वर्ष २०२१-२२ च्या पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या एम ए हिंदी गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक आणि सुवर्ण पदक पटकावणारा विभागाचा विद्यार्थी विनोद मोहिते तसेच त्याचे शेत मजूरी करणारे आई-वडील शहाजी मोहिते व सौ.साळूबाई मोहिते यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला सत्काराला उत्तर देताना विनोद मोहिते याने आपल्या यशामागे आई वडिलांचा आशीर्वाद, गुरूजनांचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले. आई वडिलांचा गौरव ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं ही त्याने सांगितले.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन बी ए भाग एकच्या विद्यार्थ्यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू धनवडे याने, आभार प्रदर्शन संतोष समिंदर याने तर सुत्रसंचलन रेखा कारंडे हिने केले.या प्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ अपर्णा कुचेकर, प्रा.निवृत्ती लोखंडे, डॉ.बाळासाहेब मुळीक, प्रा.दादासाहेब कोकाटे प्रा. स्मिता पाटील, कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलिम शेख आणि सुरेश बनपट्टे, नदाफ, गणपत लोंढे, पोतदार यांनी परिश्रम घेतले.