हिंगणी येथे जिजाऊ जयंती निमित्त १११ रक्त पिशव्यांचे संकलन..  

करमाळा प्रतिनिधी ( देवा कदम ): हिंगणी. ता करमाळा येथे शिवशाही फाऊंडेशन च्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती तसेच युवक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्यानी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे मा. श्री गणेश करे पाटील, ऑड. अजित विघ्ने लाभले होते. तसेच आबासो पाटील , भरत जाधव, अजित झांझुर्णे, महेंद्र एकाड, बाबू खुळे पाटील, केदार वशिंबेकर, राजाराम माने, ग्रामसेवक टी.एस.येडे उपस्थित होते.यावेळी जीवन गायकवाड यांनी पोवाडा सादर केला. तसेच प्रमुख पाहुणे मा. गणेश करे पाटील व अजित विघ्ने साहेब यांनी आपले विचार व्यक्त करून शिवशाही फाउंडेशन ला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिवशाही फाऊंडेशन चे अध्यक्ष.औदुंबर बाबर उपाध्यक्ष. नितीन पाटील सचिव.नवनाथ बाबर यांनी विषेश प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबर गुरुजी यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here