हिंगणगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवडणूक बिनविरोध झाली असून राजेंद्र तात्या तांबिले यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. ही सोसायटी पंचक्रोशीतील एक अग्रेसर संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेची स्थापना 1950 साली कै. रंगनाथ दादा तांबिले व कै. मारुती विष्णू तांबिले यांनी केली आहे. आणि तेव्हापासूनच गेली सत्तर वर्ष सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. तीच परंपरा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र तात्या तांबिले व श्री छगन तांबिले( चेअरमन) तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री अभिजीत भैया तांबिले यांच्या मार्गदर्शनाखाली 2022 ते 2027 साठी ही निवडणूक बिनविरोध म्हणून पार पडली आहे. श्री राजेन्द्र तात्या तांबिले आणि अभिजीत भैया तांबिले यांच्या कामाची हीच पोचपावती म्हणावी लागेल .कारण राजेंद्र तात्या तांबिले अभिजीत भैया तांबिले यांचे काम खूप उल्लेखनीय आहे. गोरगरीब जनतेसाठी कोणतीही जात पात न बघता ते सर्वांना सहकार्य करतात. अभिजीत भैया तांबिले यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेकडून आपल्या इंदापूर तालुक्यासाठी विविध निधीतून अभिजीत भैय्या यांनी खुप विकास साधला आहे. एक युवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना ओळखले जाते. सर्व तालुक्यातील तरुणाई त्यांच्याकडे आकर्षिली आहे. म्हणूनच त्यांना म्हणतात दोस्त जिवाभावाचा मित्र ,हिंगणगाव व हिंगणगाव पंचक्रोशीतील सर्व लोकांचा अभिजीत भैया तांबिले यांना खंबीरपणे साथ असते पाठिंबा असतो, म्हणूनच आज पर्यंत हिंगणगाव सोसायटी बिनविरोध होऊ शकली, आणि या सोसायटीतील नवीन विद्यमान कारभारी असे आहेत.
१ ) तांबिले राजेंद्र मारुती
2) देवकर आनंता दिगंबर
३ ) देवकर दादासो गोवर्धन
४) पाटील हरिचंद्र साहेबराव
५) देवकर ऋषिकेश राजेंद्र
६) खटके प्रकाश विश्वास
७) तांबिले समाधान रवींद्र
८) खराडे बाळासाहेब रामा
महिला राखीव प्रतिनिधी
१) तांबिले सोनाली ज्योतिर्लिंग
२) खबाले विद्या श्रीमंत
इतर मागास वर्ग प्रतिनिधी
१) तांबिले अभिजीत राजेंद्र
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी
१ ) चोरमले धुळा राजाराम
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी
१) जगताप ज्ञानदेव जनार्दन
या सर्वांची बिनविरोध म्हणून निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बंडगर साहेब तसेच सचिव श्री मुजीब शेख यांनी काम पाहिले आहे.