हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भाजपच्या इंदापूर शहर नूतन कार्यकारिणीचा सत्कार.

इंदापूर प्रतिनिधी: निलेश भोंग
इंदापूर शहर भाजपच्या नूतन कार्यकारिणीचा व बूथ अध्यक्षांचा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अर्बन बँकेच्या सभागृहात रविवार (दि.31 ) सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
भाजप हा सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा, गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप अतिशय मजबुतीने उभा असून जनहिताची कामे करीत आहे. भाजप पक्ष संघटनेला व शिस्तीला महत्त्व आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजना, उज्वला गॅस आदी अनेक योजना ह्या तळागाळातील जनतेसाठी असून, नूतन पदाधिकाऱ्यांनी या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे काम करावे. पक्ष संघटनेच्या जोरावरच भाजप देशात सत्तेवर असून व आगामी काळात अनेक दशके सत्तेवर राहणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टपणे नमूद केले.
इंदापूर नगरपालिकेवर आपली सत्ता आल्यानंतर नगराध्यक्षा अंकिता शहा व नगरसेवकांनी शहराचा अतिशय चांगला सर्वांगीण विकास केला. राज्यात आपली सत्ता नसतानाही सुमारे 25 कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली. शहरात पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. प्रशाकीय इमारत बांधण्यात आली आहे. शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण केले, ज्येष्ठ नागरिक भवन बांधण्यात आले. स्वच्छतेचा पाच कोटी रुपयांचा पुरस्कार आपल्या नगरपालिकेला मिळाला. शहराचा सर्वांगीण विकास केल्यामुळे आगामी काळातही नगरपालिकेवर भाजप सत्ता कायम राहणार आहे. प्रत्येक निवडणूकीमध्ये पक्ष व संघटनेला महत्त्व असते. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत पक्षाने घेतलेला निर्णय हा कार्यकर्त्यांनी अंतिम समजला पाहिजे. सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने, एकमेकांना विश्वासात घेऊन काम करा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे तसेच तालुक्यातील व शहरातील भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक इंदापूर तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी केले. यावेळी मारुती वनवे, अतुल तेरखेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर तर आभार इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here