हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता अंकिता पाटील-ठाकरे यांनाही कोरोना संसर्ग.

मुंबई: नुकतेच मुंबईमध्ये अंकिता पाटील व निहार ठाकरे यांचा विवाह पार पडला या विवाहानंतर अनेक मान्यवरांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे,बाळासाहेब विखे पाटील,बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आणि आता अंकिताताई यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः अंकिता पाटील-ठाकरे यांनी ट्विटर वर दिली आहे.ट्विट मध्ये त्या म्हणाल्या की “आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.माझी तब्येत व्यवस्थित आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी.”
गेल्या आठवड्यात 28 डिसेंबर रोजी अंकिता पाटील यांचा विवाह झाला असून या विवाहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर काही विदेशी पाहुणे सुद्धा या विवाहात सहभागी झाल्याची चर्चा समजली आहे . महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना संसर्गचा विषय आता गंभीर होत चालला असून गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेली आकडेवारी आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here