इंदापूर : प्रतिनिधी- भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवार,दि. 3 जाने. रोजी बिनविरोध निवड झालेल्या भिगवणच्या भाजपच्या नूतन सरपंच दिपीका तुषार क्षीरसागर यांचे तसेच इंदापूर तालुक्यात दि. 3 व 4 जाने.रोजी निवड झालेल्या भाजपच्या सर्व उपसरपंचांचे अभिनंदन केले आहे.इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या भिगवणच्या सरपंचपदी भाजपच्या दिपीका तुषार क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली. तसेच इंदापूर तालुक्यामध्ये नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या गावांमध्ये दि. 3 व 4 जाने. रोजी उपसरपंच पदाच्या निवडी संपन्न झाल्या. या निवडीमध्ये भाजपचे निवडून आलेले उपसरपंच रोहित बाळासाहेब पानसरे (डाळज नं.2 ), सपना राजेंद्र बोंगाणे (पडस्थळ), रोहित राजेंद्र गायकवाड (रणमोडवाडी, रणगाव ), दादाराम पांडुरंग काळेल ( बिजवडी ग्रुप ग्रामपंचायत), प्रमिला सिद्धेश्वर खराडे ( हिंगणगांव ), संतोष कुबेर किसवे (थोरातवाडी ) या सर्व भाजपच्या उपसरपंचांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंचायतराज व्यवस्था बळकट करण्याकडे व त्याद्वारे ग्रामीण भागाच्या विकासाकडे विशेष लक्ष असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
Home Uncategorized हर्षवर्धन पाटील यांचेकडून भिगवणच्या भाजपच्या नूतन सरपंचांचे व तालुक्यातील नूतन उपसरपंचांचे अभिनंदन