मांजरी बुद्रुक मधील नागरिकांना दूषित पाण्यामुळे आरोग्यास धोका ? पिवळ्या पाण्याने नागरिक त्रस्त.

             📡📡जनता एक्सप्रेस न्यूज चॅनेल 📡📡
                    पत्रकार प्रतिनिधी: रवींद्र शिंदे

हडपसर: मांजरी बुद्रुकमधील गोपाळपट्टी म्हसोबा कॉलनी ढेरे बंगला व घुले वस्ती या भागातील नागरिकांना कोरोना पाठोपाठ आता दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.ग्रामपंचायत माजी सदस्य मा. सुरेश तात्या आटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापूर्वी मांजरी बुद्रुक हे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत गेल्यापासून मांजरी बुद्रुक गावातील सर्व नागरिकांना पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेही पाणी दररोज न येता दोन दिवसाआड येते आणि तेही खूप खराब, पाण्याचा वास हा गटारीच्या वासापेक्षाही खूप भयानक आहे.या पाण्याचा स्पर्श जरी शरीराला झाला तरी शरीराला पूर्ण खाज येते.हे पाणी पिल्यामुळे अनेक आजार उद्भवलेले आहेत.पाच मिनिटे पाणी भरुन झाल्यानंतर हंड्याच्या किंवा बादलीच्या तळाशी पाहिले तर प्रचंड प्रमाणात गाळ साचलेला आपणास दिसून येते व पाण्यामध्ये शेवाळा सारखे व छोटे छोटे जंतूचे प्रमाणही आहे या पाण्याने हात धुण्याची सुद्धा इच्छा होत नाही ते पाणी नागरिक कसे पिणार आणि वारंवार त्याची तक्रार देऊनही याकडे कोणीही लक्ष देत नाही तरी मांजरी बुद्रुक मधील सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा न्याय कधी मिळणार व त्यांना स्वच्छ पाणी पिण्यास कधी मिळणार हा प्रश्न सर्व नागरिकांना आस लागून राहिली आहे.. याचा त्वरित पाठपुरावा करावा व पिण्याच्या पाण्याचे नमुने पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडे तपासण्यास द्यावे व लवकरात लवकर याचा पाठपुरावा करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत माजी सदस्य मा. सुरेश तात्या आटोळे यांनी केली.
आता या बाबत लवकरात लवकर स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू अश्या भावना या परिसरातील नागरिकांच्या आहेत.



Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here