दौंड तालुका प्रतीनिधी -गणेश खारतुडे
■ खडकी (दौंड) : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या ३२ चारी व ३५ चारी तसेच ओढा, बंधारे व पिण्याच्या पाण्याचे तळे यांच्यासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाबाबतीत नुकतीच स्वामी चिंचोली गावाचे सरपंच प्रतिनिधी अॅड. मच्छिंद्र मदने व ग्रामपंचायत सदस्य धनाजी मत्रे यांनी दौंड तालुका लघू पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी डी. बी. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीदरम्यान डी. बी. पाटील यांच्याशी पाण्याच्या असणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली व स्वामी चिंचोली गावाच्या पाण्याच्या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.