इंदापूर (प्रतिनिधी: विशाल रणवरे): स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे कार्य कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी शिक्षक परिवारातील पदाधिकारी कार्यरत असतात.विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबविले आहेत.कोरोना काळात जिल्हा परिषद शिक्षकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकरमामा भरणे यांनी व्यक्त केले.
आज स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात आणि शिक्षक संघटना क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक बांधवांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मा.मधुकरमामा भरणे आणि मा.जिल्हा परिषद सदस्य अमोलशेठ भिसे यांच्या हस्ते करण्यात आला.
👉 यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे म्हणाले की आठ वर्ष आमदार आणि दोन वर्षे मंत्री असूनही भरणे मामा चा फोटो शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल. त्यासाठी शिक्षक पतसंस्थेत परिवर्तन घडवून आणावे असेही आवाहन यावेळी अमोल भिसे यांनी केले.
👉 या कार्यक्रमात इब्टा संघटनाचे राज्य समन्वयक किशोर वाघ म्हणाले की,आगामी काळात स्वाभिमानी शिक्षक परिवारातील चार ही शिक्षक संघटना एकत्रित पणे शिक्षकांचे प्रश्न सोडवतील.ऑनलाइन व्हिडीओ निर्मितीत महिला शिक्षिकांनी केलेल्या कार्यामुळे शिक्षण विभागाची मान उंचावली.
👉 शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष सतीश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की वस्तीशाळा शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक भारती स्वाभिमानी शिक्षक परिवारा सोबतच राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
सदरच्या कार्यक्रमासाठी सत्कारमुर्ती मध्ये बबन सुरवसे ,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त इशरत मोमीन, संदिप येवले,सतीश भोंग ,जयश्री सरके आणि सुप्रिया आगवणे त्याचप्रमाणे शिक्षक भारती कार्यकारणी सतीश शिंदे- तालुकाध्यक्ष, बाळासाहेब चव्हाण – मा.तालुकाध्यक्ष ,सतीश राऊत – उपाध्यक्ष ,सचिन गुरव- सरचिटणीस,संदिप नवले- कोषाध्यक्ष, संतोष ननवरे- प्रसिद्धी प्रमुख, संतोष चोरमले-संघटक, अनिलकुमार सवाणे-सल्लागार, राजकुमार तरंगे-सोशल मिडिया प्रमुख, तुकाराम भोसले – जिल्हा प्रतिनिधी, सहदेव काळेल – जिल्हा प्रतिनिधी ,इतर पदाधिकारी – रामचंद्र शिंदे,विनोद नरूटे, चंद्रकांत वाघमारे ,तानाजी नरळे, अशोक नरूटे,अण्णा पवार, सुभाष चव्हाण, दत्तात्रय जाधव,अनिल रासकर,जावेद मुलाणी,,सतीश बाबर, भाऊसाहेब ढवळे ,विलास मारकड इ.चा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक नानासाहेब नरूटे, सुत्रसंचालन सचिन देवडे, आभार संतोष गदादे यांनी मानले.