👉 भरणेवाडीच्या सौरभची लेफ्टनंट पदी नियुक्ती
इंदापूर: भरणेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सौरभ संतोष धातूंडे या युवकाची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली असून सौरभच्या नियुक्तीने इंदापूर च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे असे गौरवोद्गार इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले
भरणेवाडी येथील निवासस्थानी सौरभ चा सत्कार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला
सौरभ चे प्राथमिक शिक्षण भरणे वाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झाले.त्यानंतर पुढील बारावीपर्यंत चे शिक्षण साताऱ्यातील सैनिक स्कुलमध्ये झाल्यानंतर बिहारमधील गया येथे ओटीए (ऑफिसर ट्रेनिंग अकादमी) मध्ये प्रवेश मिळविला त्याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर चार वर्षाचे प्रशिक्षण गया तसेच हैद्राबाद मध्ये पूर्ण केले सौरभ ने लहानपणापासून आई आजी व आजोबा यांचे शेतीमधील केलेले कष्ट पाहिले होते त्यातच लहानपणी वडिलांचे छत्र हरपले होते,अशा प्रतिकूल परिस्थितीत सौरभ हे यश पादाक्रांत केले असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले
Home Uncategorized सौरभच्या नियुक्तीने इंदापूर च्या शिरपेचात मानाचा तुरा – माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे