सोलापूर – सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यानजीक असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. उत्तर कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समजली आहे.तसेच सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे किती ठिकाणी नुकसान झाले याची अद्याप माहिती मिळालेली नाही.आज सकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. सुरुवातीला नेमकं काय सुरु अशी लोकांना गडबड जाणवली होती. त्यानंतर भूकंप झाल्याची माहिती लोकांना मिळाली आहे. सोलापूरपासून काही अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यात विजयपूर येथे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी 4.9 रिस्टर स्केल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. अद्याप कोणत्याही प्रकारची जिवितहाणी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातील लोकांना सौम्य धक्के लागल्याची त्यांनी माहिती दिली आहे. भूकंप झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कुठे काय घडलं आहे का ? याची चौकशी केली जात आहे. राज्यात मागच्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे.
महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अद्याप नुकसान झालेलं नाही. परंतु सकाळी भूकंप झाल्यानंतर काही दुर्घटना घडली आहे का ? याची जिल्हा प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे अद्याप कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती मिळाली आहे.
Home ताज्या-घडामोडी सोलापूर शहरांमध्ये भूकंपाचे धक्के, कर्नाटकातील विजयपूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू..