कुर्डूवाडी (प्रतिनिधी नसीर बागवान): सध्या रमजान महिन्याचे उपावास सुरू असून प्रत्येक मुस्लीम बांधव उपवास करत असतात याचे औचित्य साधून सोलापुरात प्रथमच पोलीस आयुक्त तर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन पोलीस आयुक्तालय निवासस्थानी करण्यात आले होते. सामाजिक सलोखा मजबूत करून स्नेह व आपुलकीचे वातावरण तयार व्हावे यासाठी लहान मुलांसाठी रोजा इफ्तार चे आयोजन केले.. यावेळी यावेळी मुख्याध्यापक आशिफ इक्बाल यांनी सांगितले की. आज सर्व मोठ्या साठी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात .पण आयुक्त साहेबांनी लहान मुलासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन हे सर्वांसाठी चांगले उदाहरण आहे.
या इफ्तार पार्टीत पोलीस आयुक्त हरीष बैजल. उपायुक्त वैशाली कडूकर .उपायुक्त बंगार साहेब व इतर पोलिस उपस्थित होते. या इफ्तार पार्टीचे खूप चांगले आयोजन करण्यात आले होते. समीर सय्यद यांनी दुवा मागितली. साद शेख नमाज पठण केले. तर इब्राहिम शेख यांनी अजान दिली.