सोलापूरमध्ये टाइम्स लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत जय हिंद क्रिकेट संघ कुर्डूवाडी संघाची विजयी सलामी.

कुर्डूवाडी प्रतिनिधी :नसीर बागवान
सोलापूर येथे झालेल्या टाइम्स लेदर बॉल स्पर्धेत कुर्डूवाडीच्या जय हिंद संघाने पहिल्या सामन्यात कर्णधार शशी ओहोळ यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर टाइम्स या संघावर पहिला विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टाइम्स इलेव्हन या संघाने 20 षटका मध्ये 8 बाद 153 धावा केल्या .शशी ओहोळ यांनी आपल्या 4 षटकामध्ये 8 धावा देऊन 1 बळी मिळवला. विल्सन काळे,सचिन गोडसे, दिनेश कणसे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.अमर शिंदे यांनी आपल्या 4 षटका मध्ये 3 गडी बाद केले.जय हिंद संघाने जिंकण्या साठी टाईम संघाने दिलेल्या 154 या धावांचा पाठलाग करताना 7 गडी गमावून विजय मिळवला. यामध्ये दिनेश कणसे यांनी आक्रमक असे नाबाद अर्धशतक करत 61 धावा केल्या. कर्णधार शशी ओहोळ यांनी 21 धावा, अमर शिंदे 25 धावा,रणवीर गवळी 18,विल्सन काळे 25 ,सचिन गोडसे 27,सस्मित गायकवाड 9 धावा जमवल्या दिनेश कणसे यांनी आपल्या गोलंदाजी मध्ये 1 गडी बाद केला व फलंदाजी मध्ये 61 धावा केल्या.अष्टपैलू कामगिरी मुळे दिनेश कणसे याला सामन्याचा सामनावीर किताब देण्यात आला. जय हिंद कुर्डूवाडीच्या संघाने साईनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली टाइम्स स्पर्धेत विजयाने सुरुवात केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here