सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबीर संपन्न.

वैभव पाटील :(पालघर जिल्हा प्रतिनिधी):-  सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग तर्फे स्व. विद्या विनोद अधिकारी व अन्यदाते विद्यार्थी गुणगौरव व विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर नागझरी येथील स्व. नामदेव भाऊ पाटील सभागृहात रविवारी (ता . 30) ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे व मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सोगल यांनी प्रास्तविक मनोगत व्यक्त केले. या प्रास्ताविकामध्ये सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवते. यामध्ये वृक्षारोपण – वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबिर, चालू वर्षी 208 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले होते याचा आवर्जून उल्लखे केला .
👉 विद्यार्थी गुणगौरव
या कार्यक्रमास उदघाटक श्री गणेश कृषी बचत गटाचे संस्थापक प्रमोद सोगले, कार्यक्रमाचे अतिथी महेश पाटील, शुभम अधिकारी, विशाल पवार उपस्थित होते.त्यांनी विद्यर्थाना मार्गदर्शन करताना बोलत होते की, काम व्यवसाय कोणताही असू द्या नावापेक्षा कामाला महत्व द्या . कामाच्या कल्पकते मुळेच भविष्यात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात कोणत्याही एका क्षेत्रात प्राविण्य मिळवीत असताना त्यामध्ये जर अपयश आले तर खचून न जाता करियर बनवत असताना आलेल्या संधीचा उपयोग करत व आलेल्या परिस्थितीवर मात करत आपण पुढे जायचे आहे जीवनात अनेक संकटे येत असतात मात्र या संघर्षामधून अवघड वाट काढत आपल्याला ध्येय गाठायचे असते असे विशाल पवार यांनी मार्गदर्शन केले.पूर्व विभागातील एकूण 47 गावामधील एकूण 170 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मंडळाचे विश्वस्त भालचंद्र पाटील, सुनील शेलार, चंद्रशेखर नाईक, उपाध्यक्ष योगेश पाटील , विपुल पाटील , सहसचिव नितीन पाटील , उत्तम पाटील , खजिनदार हेमंत पावडे , प्रशांत सातवी गटचिटणीस, कार्यकारणी सदस्य, महिला प्रतिनिधी , विदयार्थी व पालक , मंडळाचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले .तसेच कार्यक्रमास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी विश्वस्त प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष गंगाराम घरत, माजी विश्वस्त हिरा डोंगरे , माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा मंडळाचे माजी विश्वस्त वैभव पाटील,जगदीश पाटील माजी उपाध्यक्ष अच्युत सातवी , किशोर अधिकारी, कपिल ठाकूर ,सह चिटणीस पत्रकार सुमित पाटील ,संतोष पाटील, चेतन पाटील, मंडळाचे दाते अजित अविनाश पाटील व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिटणीस कल्पेश पवार यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here