वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर येथील कै गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृहामध्ये सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहित वर्धक मंडळाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ मंडळाचे अध्यक्ष संतोष कृष्णा पावडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. 5 नोव्हेंबेर रोजी संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटक समाजातील ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्त्व रामचंद्र जनार्दन महाले यांनी उद्घाटन प्रसंगी उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी अशिर्वादरुपी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याचे जाहीर करून मंडळासाठी 21 हजार रुपयांची भरीव देणगी दिली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय गणपत राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यश्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांनी या यशाने भारावून जावू नये ही सुरुवात आहे , आपल्या सभोवताली अनेक संधी असतात त्या शोधा,आपल्या हातून संधी हुकली तर ती दुसऱ्याला मिळते,आपण प्रमाणपत्र घेवून गेलात तर ती पाहून नोकरी मिळणार नाही तर आपल्या मध्ये कोणते कौसल्य आहे,आपण त्याकामासाठी किती योग्य आहे ह्यावर संधी अवलंबून आहे,चिकाटी ,श्रम आणि मेहनत करण्याचा सल्ला दिला .त्यांनी मंडळासाठी 10 हजार रुपयांचा भरीव निधी दिला.
प्रमुख वक्ते हेमंत बबन पाटील यांनी आपल्या जीवनातील परिचित उदाहरनातून स्पर्धा म्हणजे काय? स्पर्धा परीक्षा, त्याची तयारी ,अभ्यासक्रम , लायब्ररीचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले.मोबाईल चा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा,आपल्या आई बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा,पालकांनी , मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडायची संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी आपल्या प्रास्ताविकात समाजातील दानशूर दात्यानी दिलेल्या 34 लाख रुपयांच्या भरीव देणगीच्या व्याजातून मंडळ दरवर्षी हा कार्यक्रम घेत असून ह्या वर्षी S.S.C/H.S.C/पदवी/पदव्युत्तर परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या 275 विद्यार्थ्यांचा 1 लाख78 हजार रुपयांची रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास कार्याध्यक्ष मुकेश महाले ,उपाध्यक्ष जयवंत राऊळ,विलास पाटील. सरचिटणीस संजय पाटील,खजिनदार रोहिदास पाटील, सहचिट निस जयवंत यशवंत राऊळ,विश्वस्त विषणुकांत राऊळ,शरद पाटील,विजय पाटील,विवेक कोरे आणि सल्लागार नागेश राऊळ, मार्तंड पाटील ,प्रमोद दळवी,नरेश कोरे, सुयतेजचे कार्यकारी संपादक वैभव पाटील तसेच माझी पदाधिकारी प्रभाकर पाटील,जयंत देसले,यदुनाथ पाटील,कमलाकर पाटील ,बिपिन पाटील,उमेश राऊळ,जगदीश पाटील मंडळाचे कार्यकारिणी सदस्य,महिला संघटक, गटाध्यक्ष , गटचिटणीस,पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते, कै.दादोबा का.ठाकूर वस्तीगृहातील विद्यार्थी,व्यवस्थापक भारती पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमास 350 लोकांची उपस्थिती होती.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.येत्या 13 नोव्हेंबर2022 रोजी डहाणू गटातील वाढवणं येथे होणाऱ्या 108 व्या मंडळाच्या अधिवेशन व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालाचे मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले.