सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळ आयोजित स्वप्न उद्याचे – करिअरच्या वाटांचे..

वैभव पाटील :प्रतिनिधी 📲 9850868663
रविवार दिनांक 2ऑक्टो 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून मंडळाच्या शिक्षण उपक्रम समिती आयोजित स्वप्न उद्याचे करिअरच्या नव्या वाटांचे हा कार्यक्रम मंडळाच्या स्व.गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह पालघर येथे संपन्न झाला. या प्रसंगी पालक, विद्यार्थी ,मंडळाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील , खेड्यापाड्यात वाढलेली,प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर प्राप्त केलेली वैद्यकीय,,पर्यावरण, न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) ,वाणिज्य, बँकिंग, संशोधन,समुपदेशन आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती डॉ.देवेंद्र पाटील (urologist), सचिन कोरे(C.A), विशाल पवार(invironment), विशाल पावडे (forensic lab) प्रियांका राऊळ(Banking) डॉ. राजमहेंद्र पाटील(scientist), डॉ.सुजाता साने (councillar),अनुजा पाटील(C.A) या मान्यवरांनी उपस्थितांना मी आपल्यातीलच,आपला भाऊ बहिण ,आपल्यासारखाच गावातील शाळेत शिकलेला,तरीही प्राप्त परिस्थितीचा उपयोग करून,ध्येय निश्चित करून ,मेहनतीच्या,जिद्दीच्या बळावर आणि परिश्रम करून यश कसे मिळवले ही जीवनाची प्रवास गाथा उपस्थित विद्यार्थ्यानं समोर मांडून त्यांच्या मध्ये प्रबळ इच्छा निर्माण करून मी सुद्धा माझे ध्येय प्राप्त करू शकतो हा ठाम विश्वास निर्माण केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी केले,प्रास्ताविक मध्ये कार्यक्रमाचा उद्देश स्पस्ट आहे.वक्त्यांची ओळख करून देताना त्यांच्या कार्याचा परिचय करुन दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस संजय पाटील यांनी केले.कार्यक्रमाचा शेवट कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.महेंद्र घरत यांनी केला.समिती सदस्य तथा युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सोगले सर यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी मान.सर्वश्री प्रभाकर पाटील ,जयंत देसले,,प्रल्हाद पाटील, यदुनाथ पाटील,विनोद पाटील,कार्याध्यक्ष मुकेश महाले,उपाध्यक्ष जयवंत राऊळ,विलास पाटील,सह चिटणीस अनिल पाटील,तसेच दिवाकर पाटील,कल्पेश पावडे, राजू राऊळ ,मिराज पाटील,समिती सदस्य हरेश्र्वर पाटील,चंदन दळवी,हरेश वैद्य,रंजन पाटील,हितेश पाटील,महिला संघटक,समाज बंधू भगिनी यांनी उपस्थिती दर्शवली, वसतिगृह विद्यार्थी ,व्यवस्थापक यांनी खूप मेहनत घेतली.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here