महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष बांधणी मजबूत करण्याचे काम राज्यभरात चालू आहे आणि याच अनुषंगाने आज इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या समवेत इंदापूरमध्ये पार पडली.अगदी त्याचवेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव आरडे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.आज शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस वसंत आरडे यांनी राष्ट्रवादीच्या गटबाजीला कंटाळून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा समन्वयक विशाल दादा बोंद्रे,भीमराव आप्पा भोसले तालुकाप्रमुख नितीन शिंदे , तालुका समन्वयक अरुण पवार, उपतालुकाप्रमुख आप्पासाहेब डोंगरे, संदीप चौधरी विभाग प्रमुख, अंकुश गलांडे उपविभाग प्रमुख, हेमंत भोसले माथाडी संघटनेचे सरचिटणीस दूर्वास शेवाळे उपस्थित होते याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना श्री आरडे यांनी जिवाभावाने शिवसेना वाढवीन आणि राष्ट्रवादी मधील अनेक पदाधिकारी माझ्या संपर्कात असल्याची माहिती दिली व पुढील आमदार हा शिवसेनेचाच असेल असा निश्चय करूनच मी शिवसेनेमध्ये आलो आहे अशी ग्वाही जिल्हाप्रमुख यांच्या समोर दिली.
एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष बांधणी चालू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र राष्ट्रवादीतीलच पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याने एकच खळबळ उडाली आहे. वसंतराव आरडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे सरचिटणीसपदी कार्य करत असतानाच त्यांच्या कामामध्ये त्यांच्याच तालुकास्तरीय पदाधिकारी अडथळा करत होते व पक्ष याकडे दुर्लक्ष करत होता व इतरही भरपूर कारणे असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे समजते.
मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादीचा इंदापूर तालुक्यातील एक वरिष्ठ पदाधिकारी व वसंतराव आरडे यांच्यामध्ये तुंबळ बाचाबाची झाली होती. या सर्व बाबींचा विचार करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे असे त्यांचं मत आहे.
Home Uncategorized सुप्रियाताई सुळे यांची इंदापूर तालुक्यात पक्षबांधणी चालू असतानाच पुणे राष्ट्रवादी जिल्हा...