इंदापुर:गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक गड व किल्ले चढाई करत व किल्ल्यांचे स्वच्छता व संवर्धन राखणारे इंदापूरचे शिवभक्त परिवार यांना पकाचा चहाच्या माध्यमातून तिरुपती बालाजीचे दर्शन घडले आहे. यामुळे इंदापुरातील तमाम शिवभक्त परिवाराच्यावतीने सर्व शिवभक्तांनी प्रकाशचा सत्कार केला. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, पकाचा चहाचे मालक प्रकाश खांबसवाडकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात तिरुपती बालाजी जाण्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसापासून सर्व तयारी सुरू होती. इंदापुरातील 68 जणांचा शिवभक्त परिवार जाणं-येणं व सर्व प्रकारचे नियोजन प्रकाश खांबसवाडकर शिवभक्ताने केले होते. ट्रेनचं बुकिंग, दर्शनासाठी चे पास, पोहचल्यावरचा खाजगी प्रवास, जेवण, नाश्ता, प्रवासामध्ये लागणारी औषधे, प्रवासामध्ये जाताना कोणते कोणते साहित्य घ्यायचे या सर्व प्रकारचे नियोजन एकट्या प्रकाश ने केले होते. ठरलेल्या सुनियोजित प्लॅनिंग प्रमाणे शनिवारी दिनांक 11 डिसेंम्बर रोजी दुपारी 4 वाजता सर्व शिवभक्त सोलापूरकडे रवाना झाले व 8 वाजता रेणुगुंठा याठिकाणी जाण्यासाठी ट्रेन येणार होती याचे परफेक्ट नियोजन केल्यामुळे जाताना कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. ट्रेनमध्ये जाताना नितीन सरडे यांनी व्याख्यान सांगायची कल्पनाही प्रकाशने दिली होती. नितीन सरडे यांचे व्याख्यान चालू झाल्यापासून संपेपर्यंत शिवभक्त त्यांच्या व्याख्यानास मनसोक्त दाद देत होते,त्यांच्या या व्याख्यानामुळे प्रवासाचा कोणालाच कंटाळा येत नव्हता. ही मोहीम तंतोतंत पद्धतीने व आपल्या नियोजनबद्ध कौशल्याने तब्बल 68 शिवभक्तांना यशस्वीरित्या बालाजी दर्शन घडून आणल्याबद्दल आज इंदापूरमध्ये शिवभक्त परिवार इंदापूर यांच्याकडून प्रकाश यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्रकाश म्हणाले की,” मी एकटा नसून हे सर्व श्रेय सर्व शिवभक्तांचे आहे यामध्ये मनोज मोरे,सतिश इंगळे, नितीन सरडे,अनिल गुळूमकर,आबा राखुंडे, ऍड.रणजित चौधरी, तुषार उबाळे सर, प्रशांत पाटील, गोरख राखुंडे,सचिन शिंदे रुपेश शिंदे,शाम आल्हाट व सर्वच शिवभक्त या सर्वांचेच श्रेय आहे.” पुढे प्रकाश म्हणाले की, “शिवभक्त परिवारा मुळे मला एका वर्षात तिसऱ्यांदा बालाजी दर्शन घडले याचा मला पुरेपूर आनंद आहे.” प्रकाशने केलेल्या तंतोतंत नियोजनामुळे शिवभक्त परिवारातर्फे महादेव सोमवंशी यांनी त्यांचा सत्कार केला व आभारही मानले.
संग्रहीत फोटो शिवभक्त परिवार, इंदापूर