सुधाकर बोराटे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्काराने सन्मानित.पत्रकारीता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान.

इंदापूर:पत्रकार बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी अग्रेसर राहुन न्याय मिळवून देणारे निर्भीड व निपक्षपाती पत्रकार सुधाकर बोराटे यांना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे, पीपल रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे (सर) यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे व युवक प्रदेशाध्यक्ष संजय (भैय्या) सोनवणे हे प्रमुख उपस्थित होते.निर्भिड पत्रकार म्हणून सुधाकर बोराटे हे गेली बारा तेरा वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कोणत्याही दबावाला बळी न पडता अविरतपणे काम करत आहेत.पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला समर्पित केले असून दैनिक लोकमत या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून निर्भीडपणे काम सुरू आहे. दलबदलु पत्रकारितेला बाजूला सारून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सुधाकर बोराटे हे नेहमीच अग्रेसर राहीले असुन त्यांच्या याच कार्याची दखल घेवुन पिपल्स रिपब्लिकन पार्टीने त्यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहिर केला.सुधाकर बोराटे यांनी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी प्रमाणिकपणे पत्रकारिता जोपासली आणि वाढवली आहे. ते सामान्य कुटुंबातील असून त्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर कष्टकरी सामान्य अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे.लेखणीच्या जोरावर मार्मिक विषयावर लिखाण करून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणारे पत्रकार सुधाकर बोराटे यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने समाजभुषण पुरस्कारासाठी करण्यात आलेली निवड योग्य असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here