“सुदैवाने इंदापूरला दत्तामामांच्या रूपाने चांगला लोकप्रतिनिधी मिळाला”पवारसाहेबांकडून दत्तामामांच्या पाठीवर कौतुकाची थाप… 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच इंदापूर तालुक्याचा दौरा करून बोरी आणि कळस परिसरातील द्राक्षबागा तसेच ऊस शेतीची पाहणी केली.तसं पाहिले तर “कृषी” हा शरद पवारांचा अतिशय जिवाळ्याचा व आत्मियतेचा विषय!!या क्षेत्रातील त्यांचे असलेले अफाट ज्ञान तसेच सत्ताकाळातील या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन देशातील कृषी अर्थ व्यवस्थेला दिलेली बळकटी असो किंवा अन्नधान्याच्या बाबतील देशाला स्वयंपूर्ण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे,हे जगजाहीर आहे.आजही त्यांची शेतीशी नाळ घट्ट विणलेली आहे.ते नेहमीच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतपिकांना प्रत्यक्ष भेटी देत मार्गदर्शन करत असतात.अशाच प्रकारे त्यांनी नुकतीच बोरी येथील द्राक्ष बागांना तसेच कळस परिसरातील ऊसाच्या शेतींना माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समवेत पाहणी केली.यामध्ये शेतकऱ्यांनी वापरलेल्या आधुनिक तंत्रज्ञान तसेच इतर सर्व गोष्टींची त्यांनी बारकाईने माहिती घेतली.यानिमित्ताने उपस्थितांशी संवाद साधत असताना भरणे मामांनी प्रत्येक गावो-गावी,वाडी-वस्तीपर्यंत दळणवळणासाठी रस्त्यांचे मजबूत जाळे ऊभा केल्याने आमच्या बहुतांशी समस्या सुटल्या आहेत.व्यापारी वर्ग मोठमोठ्या शहरातून थेट शेतापर्यंत पोहचत आहेत‌.त्यामुळे शेतमाल विक्री करणे,नविन बाजारपेठ शोधणे सोपे झाले आहे.या व्यावसायिक स्पर्धेतून शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी श्री.पवार यांना सांगितले.त्यावेळी त्यांनी श्री.भरणे यांचे तोंडभरून कौतुक केले.ते म्हणाले की,तालुक्याच्या विकासासाठी उत्तम लोकप्रतिनिधी असावा लागतो,आणि सुदैवाने इंदापूरला दत्तामामांच्या रूपाने चांगला लोकप्रतिनिधी मिळाला आहे,त्यामुळे ते तालुक्यातील विकासकामांसाठी अपार कष्ट करत असल्याचे सांगत श्री.पवारांनी भरणेंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनीही टाळ्यांच्या कडकडाटात पवारसाहेबांना दाद दिली.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,बाळासाहेब तावरे,प्रशांत काटे,प्रतापराव पाटील,हनुमंत बंडगर,बाळासाहेब पाटील,भरत राजेभोसले,हनुमंत कोकाटे,सचिन सपकळ,दत्तात्रय घोगरे,संग्रामसिंह पाटील,अतुल झगडे,शुभम निंबाळकर,सचिन खामगळ,रेहना मुलाणी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here