सिद्धी भिटे या मुलीस न्याय मिळवून देणार- राजवर्धन दादा पाटील

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बोरी येथील नववीत शिकत असलेल्या सिद्धी भिटे या अल्पवयीन मुलीने काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी बोरी येथील भिटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी या कुटुंबाचे सांत्वन केले तसेच या भेटीच्या वेळी सिद्धीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सिद्धी गजानन भिटे या मुलीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. सिद्धीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
भिटे कुटुंबावर या घटनेमुळे मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून अशा घटना घडू नये यासाठी सर्वांचा सामाजिक प्रयत्न असला पाहिजे असे मत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here