साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाने बाभुळगावने राबवलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद;

इंदापूर: ” रक्तदान हेच जिवदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान ” असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयात आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडुन लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन बाभुळगाव मधील “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” मित्र मंडळाने आज दि.२४/८/२०२२ रोजी “रक्तदान शिबीराचे ” आयोजन केले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त बाभुळगाव मध्ये जयंती महोत्सव कमिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.त्याची सुरुवात आजपासून रक्तदान शिबिराने करण्यात आली आहे.आयोजित या शिबिराचे उद्घाटन ७६ वेळा रक्तदान केलेले रक्तमहादाता दत्ता जाधव रांझणीकर , पोपट भोसले, विठ्ठल मोरे, मधुकर खिलारे, बंडु जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.विशेष म्हणजे गावातीलच तरुण वर्गाने रक्तदान करुन शिबिर यशस्वी केले. रक्ता वाचून जीव गमवाव्या लागणाऱ्या रुग्णांसाठी छोटीशी केलेली मदत म्हणजे आजचे रक्तदान शिबीर आहे , असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.”मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर” व अविनाश नामदेव ननवरे यांच्या सहकार्याने बाभुळगाव मधील “जगताप क्लिनिक” येथेच शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष-अल्ताप शेख ,उपाध्यक्ष – सागर लोंढे खजिनदार – महेश मोरे व जयंती महोत्सव कमिटीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here