इंदापूर:(उपसंपादक:संतोष तावरे )शेतकऱ्यांनो आपले काढणीस आलेले डाळिंब असेल तर सावधान,, सावधानता बाळगा, सतर्क रहा. कारण अवसरी ता. इंदापूरमध्ये अरुण साधू शिंगटे यांचे दोन एकर बागेतील जवळपास ९०० रोपावरील डाळिंब एक जुलै रोजी रात्री चोरीला गेले आहे.चोरट्यांनी काढणीस आलेल्या मालाचा सुपडा साफ केला आहे. आणि काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं… .त्यामुळे अवसरी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांपुढे मोठे डाळिंब चोर टोळीचे संकट उभे राहिले आहे. सध्या बाजारपेठेमध्ये डाळिंबाला समाधानकारक भाव मिळत आहे.लहान मुलांनाही संभाळत नसेल एवढे डाळिंबाला शेतकरी सांभाळतो. दिवस रात्र कष्ट करून तो डाळिंबाची निगा करत असतो. डाळिंबाला लागणारी खते, औषधे यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. एक एकर डाळिंब बाग सांभाळण्यासाठी जवळपास शेतकऱ्यांना लाखो रुपये लागतात. एवढा मोठा खर्च करून देखील पुढे डाळिंब मार्केटला कसे जाते त्याला कसा भाव मिळतो हे कोणालाही सांगता येत नाही. तरीही बिचारा शेतकरी दिवस-रात्र कष्ट करून मोठ्या प्रमाणावर त्याला खर्च करून डाळिंब पिकवतो. सर्व संकटांचा तो सामना करतो आणि जेव्हा पीक काढणीस येते तेव्हा असा त्या डाळिंबावरती चोरट्याकडून डल्ला मारला जातो, तेव्हा त्या शेतकऱ्याला काय वाटत असेल, आपण कल्पना करू शकता. त्या पिकावरती शेतकऱ्यांनी कितीतरी स्वप्न रंगवलेले असतात,परंतु आज संध्याकाळी बघितलेले डाळिंब, उद्या सकाळी जर आपण शेतात जाऊन बघितले, आणि त्या झाडावरती डाळिंब नसेल तर त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय होत असेल आपण थोडीशी बातमी वाचताना कल्पना करू शकता. अशीच डाळिंबाची बाग अवसरीतील अरुण साधू शिंगटे यांनी आपल्या शेतामध्ये फुलवली होती. त्याला चांगल्या प्रकारे फळेही लागलेली होती. त्यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्चही केला होता, आणि ते डाळिंब काही दिवसातच मार्केटलाही विकायचे होते, त्या डाळिंब मालाची शिंगटे यांना साडेतीन ते चार लाख रुपये होतील अशी अपेक्षा होती. परंतु ते डाळिंब चोरीला गेल्यामुळे अवसरी व अवसरी पंचक्रोशीत शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मायबाप सरकार तुम्हीच सांगा..आता शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं?एकीकडे शेतामध्ये कोणत्याच पिकाला हमीभाव नाही, मोठ्या प्रमाणावर खतांच्या आणि औषधांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत .सध्या पाहिजे तेवढा अपेक्षित पाऊस सुद्धा नाही. कोणत्याही प्रकारची पेरणी देखील आत्तापर्यंत नाही होऊ शकली. मग मायबाप सरकार तुम्हीच सांगा शेतकरी उभा तरी कसा राहील हो, थोडे शेतकऱ्याकडेही लक्ष द्या की हो, अशाच काहीशा भावना शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहे. आता या भुरट्या डाळिंब चोरीचा इंदापूर पोलिसांकडून कशा पद्धतीने बंदोबस्त केला जातो हे पाहण्याजोगे ठरेल..
Home Uncategorized सावधान शेतकऱ्यांनो…! इंदापूर तालुक्यात डाळिंबचोर टोळी सक्रिय… मायबाप सरकारहो.. आम्ही जगायचं कसं?...