सावकारांचे धाबे दणाणले..! सावकारकीतुन केलेली खरेदी खते रद्द करण्याचे सहकार विभागाला अधिकार. लोकांनी पुढे येऊन पोलिसांकडे गुन्हे नोंदवावेत. जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन.

सध्या सगळीकडेच अवैद्य सावकारकीचा सुळसुळाट चालू असल्याचे दिसून येत आहे .लोकांची सावकारकीतुन पिळवणूक होत असल्याचे आढळून येत आहे आणि त्यामुळेच अवैद्य सावकारकी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले पाहिजेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ .राजेश देशमुख यांनी केले आहेत. त्यामुळे लोकांनाही न घाबरता निर्भीडपणे पुढे येऊन पोलिसांकडे गुन्हे दाखल केले पाहिजेत. सहकार विभागाच्या प्रत्येक सहाय्यक निबंधकांनी जास्तीत जास्त तपासणी करावी आणि योग्य पद्धतीने गुन्हे दाखल होतील याकडे लक्ष द्यावे असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत .महाराष्ट्र सावकारी अधिनियमाबाबत समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यावेळी पुणे शहराचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नारायण आघाव ,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त पद्माकर घनवट, पुणे शहर पोलीस आयुक्तालय चे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, आणि पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक बाळासाहेब तावरे, यांच्यासोबत पुणे शहरातील सहकारी संस्थेचे उपनिबंधक उपस्थित होते. अवैद्य रित्या सावकारकी विरोधात तक्रारी करण्याच्या अनुषंगाने पीडित नागरिकांनी पुढे येण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. तक्रारदारांमध्ये आपली दखल घेतली जाईल असा त्यांचा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे .त्यामुळे पीडित नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क करणे गरजेचे आहे. सहकार विभागाला या कायद्याच्या अनुषंगाने व्यापक अधिकार असून व्याजाच्या बदल्यात केलेली खरेदी खते रद्द करण्याचा महत्वाचा अधिकार या विभागाला आहे. पोलीस आयुक्त श्रीनिवास घाडगे म्हणाले, अवैध्य सावकारी विरोधात कारवाई करण्यासाठी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती द्यावी संबंधितांवर गतीने संयुक्तपणे कारवाई केल्यास अशा गैरप्रकारांना निश्चित आळा बसल्याशिवाय राहणार नाही. पोलीस प्रशासन देखील यामध्ये पूर्ण सहकार्य करेल असे ते म्हणाले. कोणताही सावकार कितीही मोठा असला, तुम्हाला तो त्रास देत असेल, दमबाजी करत असेल ,तुमची पिळवणूक करत असेल, तुमचे व्याजाच्या बदल्यात खरेदी खत लिहून घेतले असेल, तुमचे जगणे मुश्किल करत असेल, तर अशा सावकारानं विरोधात पीडित नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन पोलिसांमध्ये गुन्हे नोंदवावेत असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले आहे.सर्रासपणे सावकार व्याज 20 ते 25 टक्क्यांपर्यंत घेतायेत असे चित्र आहे. आपल्या पुणे जिल्ह्यात परवाना असलेले 1 हजार 456 खाजगी सावकार आहेत. त्यापैकी 404 परवानाचे नूतनीकरण झाले आहे 982 प्रलंबित आहेत. त्याबाबत गतीने कारवाई करण्याचे निर्देश सहाय्यक निबंधकांना दिले आहेत .अवैद्य सावकारी रोखण्यासाठी सर्व तालुक्यात स्थायी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. आणि पोलीस व सहकार विभाग महसूल विभागाच्या समन्वयाने यामध्ये काम सुरू आहे हा गुन्हा यापूर्वी अदखलपात्र होता मात्र आता कायद्यात दुरुस्ती करून आता दखलपात्र करण्यात आल्यामुळे सावकारांचे धाबे दणाणले आहेत आणि अशा गुन्ह्यांना आळा बसला आहे. तरी सावकरांच्या विळाख्यात सापडलेल्या पीडित नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हे नोंदवावेत असे आवाहन केले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here