इंदापूर (प्रतिनिधी) : काल (दि.२३ जानेवारी) रोजी पुणे येथे लहुजी शक्ती सेना संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मातंग हृदयसम्राट विष्णूभाऊ कसबे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. या कार्यक्रमात राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अनेक निष्ठावंत व जुन्या पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात येऊन मोठी जबाबदारी देण्यात आली. पुणे जिल्हा अध्यक्षपदी कार्यरत असणारे दत्ताभाऊ जगताप यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष मातंग हृदयसम्राट विष्णू भाऊ कसबे यांच्या हस्ते दत्ताभाऊ जगताप यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
दत्ताभाऊ जगताप हे पूर्वी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष या पदावर कार्यरत होते. दत्ताभाऊ हे मूळचे इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ गावचे रहिवासी असून त्यांचा संघटनेच्या माध्यमातून राज्यभर दांडगा संपर्क आहे. संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्याबरोबर अनेक वेळा महाराष्ट्र दौरा त्यांनी केला असून संघटनेच्या राज्यस्तरीय प्रत्येक आंदोलनात दत्ताभाऊंचा सहभाग असतो. तालुक्याबरोबरच संपूर्ण पुणे जिल्ह्यात युवकांचे मजबूत संघटन त्यांच्या पाठीशी असून शांत व प्रसंगी आक्रमक स्वभावामुळे दत्ताभाऊ हे व्यक्तिमत्व सतत चर्चेत असते. त्यांचा सर्वसामान्य बरोबरच प्रशासकीय अधिकारी वर्गाबरोबर देखील अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. राज्य कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे तालुकयासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मातंग हृदयसम्राट विष्णू भाऊ कसबे यांच्यासह कैलासदादा खंदारे (महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी अध्यक्ष),सागरभाऊ लोखंडे (राज्य कार्यकारणी सदस्य),रोहितभाऊ खलसे (राज्य कार्यकारिणी सदस्य),संजय कदम (राज्य कार्यकारिणी सदस्य),महादेव भोसले (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष),खंडू आप्पा बनसोडे (पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष),वसंत देढे (सोलापूर जिल्हा अध्यक्ष कोअर कमिटी),या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुका, जिल्हा व विभागीय प्रमुख पदाधिकारी व लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Uncategorized सार्थ निवड: दत्ताभाऊ जगताप यांची लहुजी शक्ती सेना संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य...