सायकल दिनानिमित्त 1500 सायकलस्वारांचे इंदापूर येथे राष्ट्रसेवा दल व इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने स्वागत.

पुणे ते पंढरपूर व पंढरपूर ते पुणे भव्य सायकल रॅली.
इंदापूर: सायकल दिना निमित्त 1500 सायकल स्वरांचे इंदापूर येथे राष्ट्रसेवा दल व इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने सरबत व थंड पाणी देऊन स्वागत स्वागताने सायकल स्वार भारावले. इंदापूर शनिवार दिनांक 3 जून 2023 रोजी संपूर्ण भारतभर सायकल दिन साजरा केला जातो .या सायकल दिना निमित्त पुणे ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पुणे असे पाचशे किलोमीटरचे अंतर सायकलिंग करून पार पाडत पंधराशे सायकल स्वार सायकल रायडींग करतात प्रचंड उन्हाचा त्रास आणि लांब पल्ल्याचा प्रवास हा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून गेली अनेक वर्ष अशा प्रकारचे सायकलींग करणाऱ्या युनिटला या वर्षी पासून इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती व राष्ट्रसेवादल यांच्या वतीने लिंबू सरबत व थंड पाणी देण्याचा उपक्रम करण्यात आला. कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालया समोर पाणी आणि सरबताचा स्टॉल लावला होता.संघर्ष समिती आणि सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या पंधराशे सायकल स्वरांचे स्वागत केले. अशा प्रकारच्या अनोख्या स्वागतामुळे सायकल स्वार भारावून गेले यावेळी बोलताना ते म्हणाले,”गेली अनेक वर्ष हौस म्हणून एकत्र येऊन आम्ही सायकलींग करतो या सायकलिंगमुळे आमचे शरीर तंदुरुस्त राहते आणि शरीरामध्ये नवीन जोश निर्माण होतो.सालाबादप्रमाणे यावर्षीही पुण्यावरून पंढरपूरला जात असताना इंदापूरमध्ये थंड पाणी आणि लिंबू सरबत यांचे स्वाद चाखण्याचा आनंद आम्हाला मिळाला. असंख्य कार्यकर्ते आणि नागरी यांनी रस्त्यावरती उभे राहून आमचे अत्यंत प्रेमाने अगत्यपूर्वक स्वागत केले. आम्ही उन्हातून प्रवास करतो आहे म्हणून संघर्ष समितीचे व राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्तेही उन्हात उभे राहिले होते . अशा प्रकारचे स्वागत पुणे पंढरपूर पर्यंत कधीही झाले नव्हते .अत्यंत उष्ण वातावरण असताना अशा प्रकारचा थंडावा आमच्या मनाला मिळाला व मन तृप्त झाले .या स्वागताने साक्षात पंढरीचा पांडुरंग विठ्ठलाचे दर्शन आम्हाला झाले”. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सायकल स्वरांनी व्यक्त केल्या.सरबत थंडगार आणि अत्यंत स्वादीष्ट बनवण्याचे कार्य नेहा कोल्ड्रिंकचे खाजाबाई बागवान यांनी केले आणि सरबतासाठी लागणारे साहित्य माजी नगरसेवक शेखर पाटील आणि सागर गानबोटे यांनी सहकार्य केले.हा सरबत अत्यंत रुचकर झाल्यामुळे सर्व सायकल पट्टू आनंदी झाले .यासाठी संजय फोटो स्टुडिओचे संजय पाटील यांनी परिश्रम घेतले तसेच ऐंशी वर्षाचे रघुनाथराव खरवडे,अर्जुन शिंदे,दत्तू अण्णा पवार हे अग्रभागी राहून सायकल स्वरांना विनंती करत होते. राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश आबा शिंदे, महाराष्ट्र राज्य राष्ट्सेवा दल संघटक गफूर भाई सय्यद, संघर्ष समितीचे महादेव चव्हाण ,हमीदभाई आत्तार,भारत बोराटे,संतोष जामदार हे अगत्यपूर्वक स्वागत करून सरबत वाटण्याचे कार्य करीत होते .हा कार्यक्रम पाहून सायकल स्वार भारावून गेले यावेळी डॉ.ओंकार ताटे यांनी उन्हापासून संरक्षण कसे करावे या विषयी मार्गदर्शन् केले व सायकल स्वारांची तपासणी करुन योग्य त्या सूचना केल्या.अभिषेक लोंढे, प्रदिप पवार या तरुणांनी विशेष परिश्रम घेतले या सायकल यात्रेचे स्वागत माजी उपनराध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे,हमीदभाई आत्तार,महादेव चव्हाण सर,मा.उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,इंदापूर अर्बनचे संचालक अविनाश कोथमीरे, पुणे जिल्हा आरपीआयचे सरचिटणीस संदिपान कडवळे,समता सैनिक दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अशोकराव पोळ, शिवसेनेचे इंदापूर शहरप्रमुख मेजर महादेवराव सूर्यवंशी,अॅड .ऋषीकेश कोथमिरे,बाळासाहेब क्षीरसागर,तसेच योग गुरु गिड्डे सर ,बिभीषण खबाले ,शंकर काशीद यांनी केले.अनेकांकडून या कार्यक्रमाचे स्वागत झाले .या कार्यक्रमासाठी वसंतराव जाधव नंदकुमार खरवडे,बापू गायकवाड यांनी परिश्रम घेत कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडला .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here