सामान्य लोकांचे लोकप्रिय असणारे संयमी नेतृत्व: शहा गावचे उपसरपंच श्री. दिलीप ( बापू )पाटील. वाढदिवस विशेष..

इंदापूर तालुक्यातील शहा गावचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले शहा गावचे उपसरपंच श्री. दिलीप ( बापू )पाटील, नाव कानावर पडले की समोर येते एक सुंदर सुदृढ शरीरयष्ठी असलेले संयमी व्यक्तिमत्व, गावात गरीब असो वा श्रीमंत, लहान असो किंवा मोठा प्रत्येकच्या सुखदुःखात ते धावत जातात, त्यांची समाजसेवा पाहून गावातील लोकांनी निर्धार केला की, जो माणूस आपल्यासाठी दिवस रात्र काम करत आहे असा व्यक्ती आपल्याला गावच्या कारभारासाठी योग्य आहे .म्हणून जनतेने त्यांना ग्रामपंचायत लढवण्यास सांगितले आणि अशोक नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाने ते ग्रामपंचायत लढले आणि निवडूनही आले, निवडून आल्यानंतर कुठलीही मिरवणूक न काढता, विजयाचा कसलाही गर्व, अभिमान न बाळगता ते पहिल्यांदा महादेवाच्या मंदिरात गेले आणि एकच प्रार्थना केली की, माझ्या गावातला हरएक ग्रामस्थ माझा आहे, कोणी विरोधात असो किंवा मित्र असो प्रत्येकाला बरोबर घेऊन गावाचा कायापालट करू असा निर्धार करत कामाला लागले आणि आज गावात प्रत्येक घरासमोर वॉटरसप्लायचे पाणी, गावातील पूर्ण रस्ते सिमेंट काँक्रिट चे करून बंदिस्त गटारीचे ही काम त्यांनी केले आहे. असे बापू युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत, दिलीप (बापू )पाटील यांचा सगळीकडेच दांडगा जनसंपर्क असल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिलीप बापूंच्या दांडग्याच्या संपर्काचा नक्कीच फायदा होईल अशी चर्चा ही चालू आहे. दिलीप (बापू )पाटील प्रत्येक महिन्यात ग्रामस्थांच्या शारीरिक, आर्थिक, गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवतात,तसेच आपल्या हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सणाला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यासाठी सर्व तरुणांना प्रेरित करतात, त्यांच्या कार्याबद्दल जेवढे बोलेल तेव्हढे शब्द कमीच पडतील आज अशा लोकप्रिय नेत्याचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगचे मोफत योग शिबिर घेण्यात आले आणि गावातील निराधार लोकांना कडाक्याच्या थंडीमुळे ब्लॅंकेट मोफत वाटप करण्यात आले आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कशाची गरज आहे ते बघून त्यांना सहकार्य करून त्यांची गरज पुरवण्याचे काम हाती घेतले आहे, अशा लोकप्रिय संयमी नेतृत्वाला जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here