सामाजिक बांधिलकी जपत लोकप्रिय व्यक्तिमत्व अनिल अण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर मध्ये होणार भव्य रक्तदान शिबिर.

इंदापूर : इंदापूर शहरामध्ये ‘आमचे मेंबर’ या नावाने सुप्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व अनिल अण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त” आमचे मेंबर मित्र परिवार” यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असून हे रक्तदान शिबिर उद्या दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान होणार असल्याचे अनिल अण्णा पवार यांनी सांगितले.रविवारी होणाऱ्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. हे रक्तदान शिबिर बाबा चौकातील वडार गल्ली मध्ये समाज मंदिरात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंदापूर शहरातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्त्व म्हणून अनिल अण्णा पवार यांच्याकडे पाहिले जाते कारण अनिल अण्णा पवार यांचे आमचे मेंबर मित्र परिवार हा ग्रुप सामाजिक उपक्रमात व मदतीस नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. समाजातील गरजू लोकांना हवी ती मदत करण्यात अनिल आण्णा पवार कुठेच कमी पडत नाहीत अशी भावना इंदापूरकरांमध्ये बोलले जात आहे.
कोरोना च्या काळामध्ये अनिल अण्णा पवार यांनी समाजासाठी केलेली कामगिरी ही सध्या चर्चेचा विषय बनत आहे कारण ज्यावेळी कोरोनाचा कहर वाढलेला होता.त्यावेळी गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू चे किट वाटप असेल किंवा हॉस्पिटल उपलब्ध करून देणे,अगदी गरजूंना पैशाची मदत करणे असेल या सर्व गोष्टी स्वतः अनिल आण्णा यांनी केल्या होत्या. एकाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीची मयत झाले असेल तर अनिल आण्णा त्या परिवाराला हवी ती मदत करत आसल्याचे दिसून आले होते..गेल्या कित्येक वर्षापासून समाजकारणाच्या माध्यमातूनच लोकांची सेवा करण्यात करण्यात त्यांना विशेष आनंद होतो असे त्यांचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आणि या समाजकारणाच्या भावनेतूनच उद्या रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे समजून अनावश्यक खर्च टाळून आमचे मेंबर मित्रपरिवाराला सूचना करून रक्तदान शिबिराचे अनिल अण्णा पवार यांनी केली आहे.उद्या होणारे या कार्यक्रमात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल, प्रवीण माने ,राजवर्धन पाटील,नगराध्यक्षा अंकिता शहा,भरतशेठ शहा,राहुलजी मखरे,विशाल बोंद्रे,महादेव सोमवंशी, स्वप्नील सावंत, रमेश पवार, रविराज पवार, राजकुमार धोत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहेआता वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक इंदापूरकरांमध्ये मध्ये नक्कीच असणार यात शंका नाही..


 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here