मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच आपल्या साधेपणामुळे जनतेची व कार्यकर्त्यांची मने जिंकण्यात यशस्वी झालेल्याची आपण कित्येक उदाहरणे पाहिली आहेत. साधे राहणीमान व आपुलकीची वागणूक यामुळे कार्यकर्त्यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आवडते व्यक्तिमत्व वाटू लागतात..अशाच एका साधेपणाचे व आपलेपणाचे उदाहरण इंदापुरातील शिवसैनिकांना पाहायला मिळाले.काल दि. २५ जून रोजी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पंढरपूर येथे ‘आषाढी एकादशी नियोजन आढावा’ बैठकीसाठी पंढरपूर येथे आले होते. मुख्यमंत्री हे पंढरपूरवरुन इंदापूरमार्गे मुंबईला जाणार असल्याचे शिवसैनिकांना समजले.रात्री देशपांडे व्हेज हाॅटेल समोरील चौकात आपल्या आवडत्या मुख्यमंत्र्यांची वाट पाहत ठराविक शिवसैनिक उभे होते.. मुख्यमंत्र्यांना भेटून सत्कार करण्यासाठी ते थांबले होते. नियमाप्रमाणे प्रोटोकॉल असल्याने अधिकार्यांनी साहेब थांबणार नाहीत असे सांगितले होते,त्यात रिमझिम पाऊस पडत होता रात्रीचे ११.३० वाजले होते,तरीही कार्यकर्ते वाट पहात होते. अखेर मुख्यमंत्री साहेबांच्या गाड्यांचा ताफा इंदापूरात दाखल झाला. महामार्गाच्या बाजूला शिवसेनेचे शहराध्यक्ष अशोक देवकर,प्रसिद्धीप्रमुख अवधूत पाटील,सोनू ढावरे, देशपांडे व्हेजचे मालक उदय देशपांडे हे स्वागतासाठी सज्ज असलेले पाहताच सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुख्यमंत्री साहेबांनी गाडी थांबवली एवढेच नव्हे तर त्या शिवसैनिकांचा सत्कारही स्वीकारला. त्याचबरोबर शिवसेनेचे शहराध्यक्ष अशोक देवकर यांच्याशी आपुलकीने चर्चाही केली. शिवसैनिकांशी स्मितहास्य करून मुख्यमंत्र्यांनी कुठलाही आव किंवा रुबाब न दाखवता शिवसैनिकांची मने जिंकली. यानंतर शहराध्यक्ष अशोक देवकर यांनी “हा क्षण आपण कधीच विसरणार नाही” अशी भावना मुख्यमंत्र्यांसमोरच व्यक्त केली.
चौकट: ठाकरे यांच्या शिवसेनेचे सरकार असताना मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरातील आषाढी एकादशीची पूजा झाली होती. या पूजेला जाताना भिगवणला मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थांबले होते.त्यावेळी शिवसैनिकांना भेटण्यास किंवा सत्कार करण्यास सक्त मनाई केली होती. त्याच वेळेस शिवसैनिकांना पोलिसांनी हाकलून दिले होते याची आठवण प्रसिद्धीप्रमुख अवधूत पाटील यांनी करून दिली व अप्रत्यक्षरीत्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमधील फरकच समोर मांडला.
Home Uncategorized साधेपणा व आपुलकीमुळे इंदापुरातील शिवसैनिकांची मुख्यमंत्र्यांनी जिंकली मने.. वाचा सविस्तर