साखर कारखान्याच्या निवडणुकीत एका मतासाठी 3 हजार मोजले,अन पार्ट्या केल्या.-शिवसेना आमदाराची कबुली.

पंढरपूर/सांगोला प्रतिनिधी: कुमार गायकवाड

सांगोला | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असतानाच शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी स्वत:विषयीच मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर साखर कारखान्यांच्या निवडणुकांमधील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी कोणती कृत्ये केली जातात आणि आपण देखील काय काय केलं, याबद्दल एकप्रकारे कबुलीजबाबच शहाजी पाटील यांनी दिला आहे. निवडणूक लढवताना एका मतासाठी 3 हजार रुपये मोजले. पार्ट्या केल्या, असं शहाजी पाटील यांनी मान्य केलं आहे.
काही वर्षांपूर्वी सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांना तीन तीन हजार रुपये रोख वाटले. यावेळी या मतदारांना हव्या तितक्या पार्ट्या देखील दिल्या. तब्बल 57 लाख रुपये वाटून ही निवडणूक लढवली होती, असा गौप्यस्फोट शहाजी पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.


Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here