सर्वसामान्य जनता विकासाचा केंद्रबिंदू मानून हे सरकार विकासासाठी कटिबद्ध राहणार- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्यासाठी जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वागत केले.
आज मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले . ज्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाचा देखील यामध्ये समावेश आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ योजना तसेच अतिवृष्टी पूरग्रस्तांना मदत , संशोधन केंद्र सहायता यांचा यामध्ये समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादित प्रोसाहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे आहेत अति उच्च दाब, उच्च दाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार ,गणेशोत्सव , दहीहंडीसह कोरोनाकाळात तरुणांवर झालेल्या छोट्या केसेस मागे घेणार , राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च 2022 पर्यंतचे खटले मागे घेणार , नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान , पूरस्थिती मदतीसाठी जे शेतकरी वगळण्यात आले होते त्यांना मदत , पैठणमध्ये ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेला मान्यता , मुंबरी धरणासाठी 1550 कोटी , वाघुर योजनेसाठी 2288 कोटी , मराठवाड्यातील हळद संशोधन केंद्रासाठी 100 कोटींची तरतूद इत्यादी निर्णय या मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत करून सर्वसामान्य जनता विकासाचा केंद्रबिंदू मानून हे सरकार विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here